Goa Rain: घरावर झाड कोसळून महिला जखमी, वाहनांचा चुराडा, मुरगाव बंदरातील कामकाज ठप्प; गोव्यात पावसाचे धुमशान सुरुच

Heavy Rain In Goa: वेरे येथील पेट्रोलपंप शेजारील झाड संरक्षण भिंतीवर कोसळले, घटनेत दुचाकींचीही हानी झाली आहे.
Tree Uprooted In Goa Damages Vehicles
Rain In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात सलग तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाचे धुमशान सुरूच आहे. राज्यातील सर्वच भागात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. गुरुवारी (२२ मे) सकाळपासून वातावरणही दमट होते. चक्रीय वारा आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे राज्यात पडझडीच्या घटनांत वाढ झाली आहे.

दरी कोसळणे, झाडे पडून दुचाकी आणि चारचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना गुरुवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणात नोंदविण्यात आला. सावईवेरे येथे एका घरावर झाड कोसळून मोठ्या मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरात असलेल्या महिलेलाही दुखापत झाली असून तिला तत्काळ इस्पितळात उपचारांसाठी दाखल केले आहे.

Tree Uprooted In Goa Damages Vehicles
Goa Politics: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे टेन्शन वाढलं; मडगावसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला? दत्ता नायक यांच्या मुलाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रमुख घटना

१) सावईवेरे येथे घरावर झाड कोसळून मोठी हानी, घरातील महिला जखमी झाल्याने उपचारासाठी इस्पितळात दाखल.

२) चक्रीय वारे वाहण्याची शक्यता वर्तविल्याने मुरगाव बंदरातील कामकाज ठप्प.

३) खोबरावाडा कळंगुट येथे झाड कोसळून पाच चारचाकी वाहनांचा चुराडा.

४) वेरे येथील पेट्रोलपंप शेजारील झाड संरक्षण भिंतीवर कोसळले, घटनेत दुचाकींचीही हानी.

५) इंदिरानगर चिंबल येथे तीन माड कोसळून दुचाकी आणि चारचाकीची जबर नुकसान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com