Goa News | Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: दिंडी महोत्सवात विठूनामाच्या गजराने दुमदुमले मठग्राम

Goa Culture: दिंडी महोत्सव : हजारो भाविकांची उपस्‍थिती; गायन मैफली रंगल्‍या; उदंड प्रतिसाद

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Culture: मडगाव येथील प्रसिद्ध दिंडी महोत्सव आज रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा दिंडीचे 113 वे वर्ष. दोन वर्षांच्या कालावधीनंतर दिंडी उत्सव साजरा करताना आयोजक, भाविकांच्या उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. सकाळपासून शहरात दिंडीचा माहोल होता. श्री हरी मंदिर तसेच कोंब येथील श्री विठ्ठल मंदिर उत्सावाचा केंद्रबिंदू होता.

पहाटेपासूनच दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी व्‍हायला सुरवात झाली. दोन्ही मंदिरांत सकाळपासून श्रींस अभिषेक व धार्मिक विधींना प्रारंभ झाला. सकाळी 10.30 वाजता श्री हरी मंदिरात सुरेंद्र बोरकर व साथीदारांचा भजनाचा कार्यक्रम रंगला. दुपारी 12 वाजता महाआरती व नंतर महाप्रसाद झाला. संध्याकाळी 5 वाजता वारकरी संप्रदायातर्फे भजनाचा कार्यक्रम झाला.

नंतर 6.30 वाजता श्री माऊलीच्या धार्मिक ग्रंथासह श्रींची रथात स्थापना करण्यात आल्‍यानंतर श्री हरी मंदिरात प्राजक्ता काकतकर व अभिषेक काळे यांची पहिली गायन बैठक रंगली. दुसरी बैठक न्यू मार्केटमध्ये व तिसरी बैठक नगरपालिका चौकात पार पडली. या बैठकांनंतर दिंडीचे प्रयाण श्री दामोदर साल व श्री विठ्ठल मंदिराकडे झाले.

विद्युत रोषणाईमुळे सर्वत्र लखलखाट

मडगाव सम्राट क्लब, श्री दामबाबाले घोडे, युव संजीवनी, सॉलिड पार्टी या संस्थांतर्फे विविध स्पर्धा व संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री हरी मंदिर ते नगरपालिका चौक, आबाद फारिया रस्ता, श्री दामोदर साल व कोंब येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात म्‍हणजेच मठग्राम नगरीत विद्युत रोषणाईमुळे झगमगाट झाला होता.

कोंबवाडा येथील महिला नूतन इंग्लिश हायस्कूलकडे युव संजीवनी संघटनेने झावळांचे आकर्षक प्रवेशद्वार सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. नगरपालिका बाग परिसर, आबाद फारिया रस्ता व श्री विठ्ठल मंदिर परिसरात एक दिवस आधीच खाज्यांचे, खेळण्‍यांचे, खाद्यपदार्थांचे मांड थाटले गेले होते. त्‍यामुळे प्रत्येक ठिकाणी लोकांची गर्दी होती.

आज गोपाळकाला, गायन मैफल :

उद्या सोमवारी सकाळी दिंडी श्री हरी मंदिरात पोहोचल्यावर गोपाळकाला, पावणी तर रात्री 8 वाजता सुप्रसिद्ध गायिका सुजाता गुरव (धारवाड) हिच्या गायनाने दिंडी महोत्सवाची सांगता होणार आहे. यंदाच्या दिंडी उत्सवास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार यांनी उपस्‍थिती लावल्‍यामुळे आयोजकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT