Sudhin Dhavlikar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘जसे कर्म करता, तसे फळ मिळते’, मंत्री ढवळीकरांनी गोविंद गावडेंना काढला चिमटा Watch Video

Sudhin Dhavlikar On Govind Gaude: प्रियोळमध्ये पक्ष मजबूत करण्याबाबत बोलताना ढवळीकर म्हणाले, मगो प्रियोळच नव्हे तर संपूर्ण गोव्यात सक्रिय आहे.

Pramod Yadav

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या मंत्री गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलीय. गावडे यांच्यावरील कारवाईवर भाष्य करताना मंत्री सुदीन ढवळीकरांनी, ‘जसे कर्म असतात तसे फळ मिळते,’ अशी प्रतिक्रिया देत गावडेंना चिमटा काढला.

मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे असलेल्या आदीवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप गोविंद गावडे यांनी प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात केला होता. श्रमशक्ती भवनखाली कंत्राटदाराकडून पैसे घेऊन फाईल मंजूर केल्या जातात असे गावडे म्हणाले होते. गावडेंच्या वक्तव्याची पक्ष आणि स्वत: मुख्यमंत्री सावंतांनी गंभीर दखल घेतली. पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी अखेर गावडेंना मंत्रिमंडळातून हकालण्यात आले.

वीज खात्याचे खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी गोविंद गावडे यांना चिमटा काढला. ‘जसे कर्म असतात तसे फळ मिळते,’ अशी प्रतिक्रिया देत ढवळकरांनी गावडेंना डिवचले. प्रियोळमध्ये पक्ष मजबूत करण्याबाबत बोलताना ढवळीकर म्हणाले, मगो प्रियोळच नव्हे तर संपूर्ण गोव्यात सक्रिय आहे. केवळ त्याला उभारी देण्याची गरज आहे. युतीत देखील मगोचे काम सुरुच राहील, असे ढवळीकरांनी स्पष्ट केले.

https://www.facebook.com/share/v/1Bi7wFVXeQ/

गोविंद गावडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एक खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ढवळीकरांना राजकाणात आणले ही सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले होते. राज्यातील बहुजनांमध्ये फूट पाडण्याचे काम ढवळीकरांनी केले तसेच, लाचारीचा मार्ग देखील यांनीच दाखवला, अशी जहरी टीका गोविंद गावडेंनी केली होती. घराघरांत वाद लावण्याचे काम देखील ढवळीकरांनी केल्याची टीका गावडेंनी केली होती.

दरम्यान, गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून निष्कासित केल्यानंतर आणखी दोन मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pune Crime: रंगकाम करताना घरमालकाला लावला चुना; पुण्यात 4 लाखांची चोरी करणाऱ्या प्रमोदला गोव्यात अटक

Goa Crime: मुंगूल-मडगावातील गँगवॉरचा गोव्यातील अंडरवल्डशी संबंध; वॉल्टर गँगने 2 वर्षापूर्वीच्या मारहाणीचा घेतला बदला

Poco M7 Plus धमाका! खास मोबाईलप्रेमींसाठी पोकोने लॉन्च केला धमाकेदार स्मार्टफोन, Vivo आणि Realme चं वाढलं टेन्शन; जाणून घ्या अफलातून फीचर्स

Nitin Raiker: अभिमानास्पद! अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांना भारत सरकारचा 'ब्रॉन्झ डिस्क मेडल' पुरस्कार जाहीर

Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा! गोव्यात मंत्री, राजकीय नेत्यांनी घरी फडकवला भारतीय ध्वज

SCROLL FOR NEXT