Sudin Dhavalikar smart meter statement Dainik Gomantak
गोवा

Smart Electricity Meter: 'स्मार्ट मीटर'बाबत लोकांत अज्ञान! ‘स्मार्ट जनजागृती झाली नाही; वीजमंत्री ढवळीकरांची अप्रत्यक्ष कबुली

Sudin Dhavalikar smart meter statement: राज्यात विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याबाबत पुरेशी जनजागृती झाली नसल्याची अप्रत्यक्ष कबुली वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याबाबत पुरेशी जनजागृती झाली नसल्याची अप्रत्यक्ष कबुली वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. संयुक्त वीज नियामक आयोगाच्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी या जनजागृतीवर आयोगाने भर दिला होता.

अनेक लोकांना स्मार्ट मीटर म्हणजे नेमके काय, त्याचे फायदे-तोटेही त्यांना माहीत नाहीत. वीज खात्याच्या अभियंत्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला आहे. त्यानंतरच हे मीटर बसविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे ढवळीकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यात ''स्मार्ट मीटर्स''च्या अंमलबजावणीबाबत आता पुढील चर्चेची कोणतीही आवश्यकता नाही; हा निर्णय अत्यंत सखोल आणि तपशीलवार अभ्यासानंतरच घेतल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

पणजीत एका कार्यक्रमासाठी आलेल्या ढवळीकरांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, राज्यात स्मार्ट मीटर्स बसवण्याची प्रक्रिया ही केवळ सखोल मूल्यमापनानंतरच आणि ‘संयुक्त वीज नियामक आयोग’ (जेईआरसी) तसेच केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरूनच सुरू करण्यात आली आहे.

शंकानिरसन करूनच पावले उचलू!

ढवळीकर पुढे म्हणाले, कोणतीही योजना राबवताना लोकांची मते महत्त्वाची आहेत. जनतेच्या शंकांचे निरसन केल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील. ही योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारचे आर्थिक सहकार्य लाभणार आहे. मीटरमुळे वीज वापराचे अचूक मोजमाप होईल, मुख्यत्वे निश्चित वेळेवर लक्ष केंद्रीत होणार आहे. त्यामुळे ग्राहकांतील संभ्रम दूर होईल, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT