Power, Electricity Dainik Gomantak
गोवा

Goa Latest News: मांद्रे येथे वीज कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता

Goa Latest News: किरकोळ कामांसाठी करावी लागते प्रतीक्षा ; ग्राहकांची गैरसोय

दैनिक गोमन्तक

Goa Latest News: आगरवाडा वीज कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या मांद्रे विभागीय कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने एका व्यक्तीकडे तीनजणांच्या कामाचा व्याप आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कारभाराकडे लक्ष देण्याची मागणी ग्राहक करत आहेत.

मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर यांनी या कार्यालयाला आकस्मिक भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

आगरवाडा कार्यालयातील लाईनमन तसेच इतर कर्मचारी वर्ग कामाविना बसून असतात. पण मांद्रेतील कार्यालयात कर्मचारी अपुरे असल्याने तेथे कामाचा ताण वाढला आहे. आगरवाडा येथील कर्मचाऱ्यांना मांद्रे कार्यालयातील कामे दिल्यास त्या कारकुनांवरील बोजा कमी होईल व मांद्रे भागातील नागरिकांच्या तक्रारी योग्य वेळेत सोडविल्या जातील. तसेच ग्राहकांची कामे वेळेत होतील, असे चंद्रमोहन पेडणेकर म्हणाले.

आगरवाडा वीज कार्यालयातील अधिकारी, अभियंत्यांनी यात लक्ष घालून कर्मचारी नियुक्ती व कामाची व्यवस्थित विभागणी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

लाईनमनना जुंपले कार्यालयीन कामास

वीज खात्याच्या कार्यालयात सध्या अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. नवीन जोडणी मीटरसाठी येणाऱ्या ग्राहकांना कर्मचाऱ्यांअभावी बसून राहावे लागते. येथील लाईनमनना कार्यालयीन कामात व्यस्त ठेवल्याने अगदी पाच मिनिटांच्या कामासाठी ग्राहकांना तासन तास ताटकळत राहावे लागते.

तीन कामे, कर्मचारी एकच !

मांद्रे कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारी नोंद करून घेणे, ऑपरेटर आणि कार्यालयीन कामासाठी असे तीन कर्मचारी काम करत होते. गेल्या वर्षी एकाच्या निवृत्तीनंतर त्या जागी नव्या कर्मचाऱ्याची नियुक्ती झालेली नाही.

त्यामुळे एकाकडून तीन कामे करून घेण्याची वेळ खात्यावर आली आहे, असे ग्राहक चंद्रमोहन पेडणेकर यांनी सांगितले. वीज खात्यात कर्मचारी कमी असल्याने वीजमंत्री सुदिन ढवळीकर तसेच आमदार जीत आरोलकर यांनी ही समस्या सोडवावी,अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT