COVID-19

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्याचा पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांवर पोहचला; आज कृती दलाची बैठक

जगभरात वाढणाऱ्या ओमिक्रॉन या कोरोना व्हेरियन्ट संक्रमणाचा फटका आता गोव्यालाही बसत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पर्यटकांचा ओघ, रंगलेल्या पार्ट्या आणि राजकीय सभामध्ये नियमांचा उडत असलेला फज्जा याचा परिणाम रविवारी दिसून आला. गोव्याचा पॉझिटिव्हिटी दर हा 7 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांवर पोहचला. एकाच दिवशी 388 नवे रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आता सर्वसामन्यांसह व्यापारी वर्गातूनही चिंता व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, ओमिक्रॉन व्हेरियन्टच्या (Omicron variant) तपासणीसाठी लागणाऱ्या जीनोम सिक्वेंसिंग मशीन उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केंद्राकडे केली आहे. स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सोमवारी (ता.3) कृती दलाची बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये कोणते निर्णय घेतले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

जगभरात वाढणाऱ्या ओमिक्रॉन या कोरोना व्हेरियन्ट संक्रमणाचा फटका आता गोव्यालाही बसत आहे. ज्या पद्धतीने राज्यात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यानुसार ओमिक्रॉनचा संसर्गाची शक्यता व्यक्त होते आहे. त्यामुळे हा प्रसार पूर्वीच्या डेल्टा व्हेरियन्टचा नसून ओमिक्रॉनचा असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नव्या व्हेरियंटच्या तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे (एनआयओ) पाठविलेले नमुने अद्यापही प्रलंबित आहेत. सध्या या प्रयोगशाळेवर नमुने तपासाचा प्रचंड ताण असून या नमुन्यांचा अहवाल 15 दिवसानंतर मिळत आहे. त्यामुळे या नव्या व्हेरियन्टची माहिती मिळण्यास विलंब होत आहे.

जीनोम सिक्वेंसिंग मशीनचीही मागणी

देशभरात वाढणाऱ्या ओमिक्रॉन संसर्गाची शक्यता गृहीत धरून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेऊन राज्यातील कोरोना संसर्गाची तपशीलवार माहिती घेतली. यावेळी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी राज्यात वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच व्हेरियन्टच्या तपासणी लागणाऱ्या जीनोम सिक्वेंसिंग मशीनचीही मागणी केली.

आज कृती दलाची बैठक

राज्यात वाढणारे कोरोना रुग्ण आणि संभाव्य धोके, तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशी या पार्श्वभूमीवर कृती दलाची बैठक सोमवारी होणार आहे. यामध्ये रात्रीची संचारबंदी (Night Curfew) सीमेवरील (बॉर्डर) तपासणी नाक्यांवरील कार्यपद्धतीमध्ये बदल याशिवाय अन्य उपाययोजनांच्या अंमलबजावणीची शिफारस होऊ शकते.

24 तासांत एक बळी : एकूण 3523

राज्यात आतापर्यंत 1 लाख 81 हजार 570 नागरिकांना कोरोनाची (COVID-19) बाधा झाली असून यापैकी 1 लाख 76 हजार 376 रुग्ण बरे झाले आहेत. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.14 टक्के इतके आहे. सध्या राज्यात तब्बल 1671 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बळींचा आकडा 3523 झाला आहे. गेल्या 24 तासांत चौघांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले आहे. रविवारी दिवसभर 3604 संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या. त्यापैकी तब्बल 388 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

आजपासून विद्यार्थ्यांना लसीकरण

15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोरोनावरील तातडीचा उपाय म्हणून भारत बायोटेकनिर्मित कोव्हॅक्सिन ही लस आजपासून राज्यातील 29 शाळांमधून देण्यात येणार आहे. पुढील 3 दिवस ही लसीकरण (Vaccine) मोहीम सुरू राहील. यासाठी 74 हजार 200 लसीच्या मात्रा राज्याला मिळाल्या असून सुमारे 72 हजार मात्रांची गरज भासेल, अशी शक्यता आहे.

आजारी विद्यार्थ्यांसाठी वेगळी सोय

कोणत्याही रोगाशी मुकाबला करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बोलावून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ही लस देण्यात येणार आहे. तशी माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरही ही लस राज्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT