Subhahs Shirodkar | Goa News Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar VPK Institute: सहकार क्षेत्रात ‘व्हीपीके’ संस्थेचे कार्य उल्लेखनीय!

Subhash Shirodkar: म्हार्दोळात सहकार सप्ताह उत्साहात

दैनिक गोमन्तक

Subhash Shirodkar: सहकार क्षेत्रात व्हीपीके अर्बनचे कार्य उल्लेखनीय असून सहकाराच्या माध्यमातून व्हीपीकेने तळागाळातील गरजवंतापर्यंत पोचावे आणि सहकाराचा उद्देश सफल करावा, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

व्हीपीके अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 69व्या सहकार सप्ताह कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष शिरोडकर बोलत होते. हा कार्यक्रम शुक्रवार म्हार्दोळ येथील पंचायत सभागृहात झाला.

कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, सहकार निबंधक विशांत गावणेकर, सहकार भारतीचे सुभाष हळर्णकर, वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये सरपंच हर्षा गावडे, उपसरपंच रुपेश नाईक, व्हीपीकेचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, उपाध्यक्ष सूर्यकांत गावडे, संचालक हिरू खेडेकर तसेच इतर संचालक उपस्थित होते. गावडे म्हणाले, व्हीपीके अर्बनने सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य केले आहे. सुभाष हळर्णकर, विशांत गावणेकर यांनीही व्हीपीकेला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन अशोक गावडे यांनी केले.

तिघांचा सन्मान...

व्हीपीके अर्बन पतसंस्थेने यावेळेला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या तिघाजणांना सन्मानित केले. त्यात साहित्य क्षेत्रात रामनाथ गावडे, क्रीडा क्षेत्रात युतिका सतरकर तसेच सामाजिक क्षेत्रात नीतिन शिवडेकर यांचा समावेश होता. सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मनोज परब असे कोण आहेत, ज्यांनी कॉंग्रेसला उपदेश करावा'? चोपडेकर यांचा हल्लाबोल; जनतेची दिशाभूल केल्याचे आरोप

Job Scam: सांगितले हॉंगकॉंग नेले कंबोडियात! नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; मर्चंट नेव्हीच्या नावाखाली उकळले 8 लाख

Goa Education: 11 वीच्‍या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! उच्च माध्‍यमिक विद्यालये बनवणार प्रश्नपत्रिका; प्रश्‍‍नांची बँक येणार वापरात

माणुसकीची ‘जीत’! मदुराईहून चेन्नईला हेलिकॉप्टरने नेले हृदय, गोव्यातील व्यक्तीला दिला पुनर्जन्म; आमदार आरोलकरांची कार्यतत्परता

Horoscope: वर्षाचा शेवटचा सप्ताहाचा प्रारंभ! 'या' राशींना मिळणार प्रगतीची नवी संधी, वाचा तुमचे भविष्य

SCROLL FOR NEXT