Ponda Municipality Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipality: फोंडा पालिकेत नगराध्यक्ष अविश्‍वासावर आज होणार चर्चा

Ponda Municipality: फोंडा पालिकेतील संगीत खुर्चीच्या या राजकारणाला चाप बसण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Ponda Municipality: फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याविरुद्ध आठ नगरसेवकांनी आणलेल्या अविश्‍वास ठरावावर शुक्रवारी 9 रोजी चर्चा होणार आहे. यासंबंधीची बैठक पालिका संचालनालयाने सकाळी अकरा वाजता बोलावली आहे.

पंधरापैकी आठ नगरसेवकांनी हा अविश्‍वास ठराव आणला असला तरी त्यातील एक नगरसेवक गळाला असल्याने आता केवळ सातच संख्याबळ अविश्‍वास ठराव आणलेल्यांकडे उरले आहे. त्यामुळे हा ठराव बारगळल्यात जमा आहे.

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याविरुद्ध केवळ सहा महिन्यातच हा अविश्‍वास ठराव आणल्यानंतर आठपैकी एकाला भाजपने आपल्या गोटात वळवण्यात यश मिळवल्यामुळे आता ठराव आणलेले सातजण बैठकीला उपस्थित राहतात की बहिष्कार टाकतात, ते उद्या (शुक्रवारी) स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, फोंडा पालिकेतील संगीत खुर्चीच्या राजकारणाला रितेश नाईक यांच्याविरुद्धच्या अविश्‍वास ठरावाने चाप बसण्याची शक्यता असून यावेळेला विरोधकांना संधीच नाही, असे भाजप समर्थक नगरसेवकांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. त्यातच पालिका मंडळाचा कार्यकाळ केवळ चारच महिन्यांचा शिल्लक आहे, त्यामुळे अविश्‍वास ठराव आणला आणि संमत झाला तरी पुढील नगराध्यक्ष कितपत काम करेल, हाही प्रश्‍न आहे.

मगो समर्थक तोंडघशी!

अविश्‍वास ठराव आणलेल्यांत मगो समर्थक नगरसेवक आहेत. मात्र, मगो पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने हा ठराव आणण्यामागे आमचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केल्याने मगोचे सहाही समर्थक तोंडघशी पडले आहेत. त्यामुळे हा अविश्‍वास ठराव म्हणजे नुसती औपचारिकता असेल, असे भाजप समर्थक नगरसेवकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT