Goa Tourism: ''अवैध व्यवसायांवर धाड सत्र सुरुच; आता बेकायदेशीर व्यवहारही मोडीत काढणार''

पर्यटन दर्जाबाबत तडजोड करणार नाही - पर्यटनमंत्री रोहन खंवटे
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यात पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देखील पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी प्रयत्नात आहेत. त्यामुळे पर्यटन क्षेत्रासाठी अडथळा ठरणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अवैध कृत्यांना थारा दिला जाणार नाही. असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले आहे. ते पर्वरी येथे पत्रकारांशी बोलत होते.

(Tourism Minister Rohan Khanwate has said that the illegal businesses in the coastal areas of Goa will be dismantled)

पुढे बोलताना मंत्री खंवटे म्हणाले की, पर्यटन उद्योगात बेकायदेशीर व्यवहार करणारे दलाल, फेरीवाले आणि गाईड्स यांच्यापर्यंत आता असा संदेश गेला पाहिजे की, सरकार हे प्रकार खपवून घेणार नाही. राज्याला योग्य पर्यटन धोरण घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. तसेच राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनामधील गोव्याविषयीचे गैरसमज काढून टाकण्याची आवश्‍यकता आहे.

Rohan Khaunte
Mopa Airport: 'मोपा' देशातील 8 शहरांना जोडणार; 'इंडिगो'च्या प्रतिदिन 'इतक्या' फ्लाईटस् घेणार उड्डाण

पर्यटकांमध्ये चुकीचा समज निर्माण झाल्यास याचा फटका पर्यटन उद्योगाला बसणार आहे. त्यासाठी आताच खबरदारी घेण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या काळात राज्यातील पर्यटन क्षेत्रातील बेकायदेशीर व्यवहार थांबवण्यात नक्कीच यश येईल. यासंदर्भात पर्यटन खात्यानेही कारवाई सुरू केली आहे, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

Rohan Khaunte
9th world Ayurveda Congress 2022: जागतिक आयुर्वेद परिषदेला थाटात सुरुवात; मुख्यमंत्र्यांची गोमंतकीयांसाठी मोठी घोषणा

कोरोना महामारीनंतरचा काळ पर्यटन खात्यासाठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे पर्यटनाशी निगडित सेवांमध्ये वाढ व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यात उच्च दर्जाच्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नव्या साधनसुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार आहेत असं देखील मंत्री खंवटे यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com