Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipality: फोंड्यात सुरळीत वाहतुकीसाठी पालिका अन् वाहतूक पोलिसांचे कडक नियोजन

Ponda Municipality: वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर करवाई होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Ponda Municipality: फोंडा शहर परिसरात आल्मेदा हायस्कूल ते पुढे वरचा बाजार फोंडा भाग आणि फोंडा बसस्थानक ते तिस्क-फोंडापर्यंतच्या भागात कायम वाहतुकीची कोंडी होत असते. फोंडा पालिका आणि फोंडा वाहतूक पोलिसांनी कार्यवाही केली असून फोंडा शहरातील मोक्याच्या ठिकाणी चारचाकी तसेच दुचाकी पार्किंगसाठी रेखांकन केले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व चालक-पादचाऱ्यांना होणारा त्रास कमी होणार आहे.

फोंड्यात जागा मिळेल तेथे वाहन पार्क करण्याच्या पद्धतीमुळे छोट्या छोट्या कामासाठी शहरात येणाऱ्या वाहनचालकांना वाहन पार्क करण्यासाठी सबंध शहर पालथे घालावे लागते. पण त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधितांनी केलेले नियोजन दिलासादायक आहे.

दुचाक्या व चारचाकी वाहने योग्य त्या ठिकाणी शिस्तीत पार्क करण्यासाठी हे ‘मार्किंग'' केले असल्याने सध्या शिस्तीत वाहनचालकांकडून पार्किंग केले जाते. या मार्किंगच्याबाहेर जर पार्किंग केले तर वाहन चालकांवर कारवाई होणार आहेत. बेशिस्त चालकांवर कारवाईही होणार आहे.

राज्यातील इतर शहरांप्रमाणेच वाहतुकीच्या कोंडीबाबत फोंडा शहराचीही तीच स्थिती असून अलीकडच्या काळात मात्र वाहतुकीत सुसूत्रता आणण्याचा कमालीचा प्रयत्न फोंडा पालिका व वाहतूक पोलिसांनी केल्याने एक वेगळेच चित्र पुढील काळात निश्‍चितच दिसेल, असा विश्‍वास नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळी कामाधंद्याला जाणारे लोक, दुपारी शाळा, सुटण्याच्या भरण्याच्या प्रक्रियेमुळे तसेच संध्याकाळी घरी परतणाऱ्या लोकांमुळे ही वाहनांची गर्दी वाढते. त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येतील लोक व वाहनांच्या गर्दीने शहर गजबजून जाते.

त्यातच वाहतूक कोंडी झाली की कर्णकर्कश हॉर्न वाजवण्याच्या प्रकारामुळे ध्वनी प्रदूषण तर होतेच, पण ज्येष्ठ नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच शहरातील प्रत्येक क्रॉसिंगवर बरिकेडस् लावून योग्य वाट दर्शवण्याचा प्रयत्न पालिका व पोलिसांनी केला आहे.

फोंड्यातील तिस्क, वरचा बाजार, शहर परिसर व इतर ठिकाणी हे बरिकेडस् उभारण्यात आले असून त्यामुळे वाहनचालकांच्या जागा मिळेल तेथून वाहन घुसवण्याच्या प्रयत्नाला चाप बसला आहे. पुढील काळात फोंड्याचा मास्टरप्लॅन खुला होणार आहे.

फोंडा पालिकेतर्फे कृषीमंत्री रवी नाईक यांच्या सहकार्याने मास्टरप्लॅन आखण्यात आला आहे. त्यामुळे लोकांच्या सूचनांसाठी हा मास्टरप्लॅन लवकरच खुला होईल, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.

त्यामुळे नजीकच्या काळात फोंडा एक सुविहित, वाहतूक कोंडीविना चालणारे सुंदर शहर म्हणून नावारूपाला आले तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. तसेच अशाच प्रकारे इतर शहरातसुद्धा वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले तर शहरातून वाहनचालक व पादचाऱ्यांनीही त्रास होणार नाही, असे

दिवसभर पार्किंग...

फोंडा शहरात दिवसभर वाहनांचे पार्किंग होत असल्याने जागा अडून राहते. फोंड्यातून इतर शहरात कामाधंद्यासाठी जाणाऱ्यांकडून फोंडा शहरापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी आणली जाते व फोंडा शहरात ही वाहने पार्क करून मग दुसरी वाहने पकडून आपापल्या कामाच्या ठिकाणी हे लोक जातात, पण दिवसभर ही वाहने जागा अडवून ठेवतात, त्यामुळे या दिवसभराच्या पार्किंगवर योग्य तोडगा काढण्याची आवश्‍यकताही फोंडावासीयांकडून व्यक्त होत आहे.

42 हजार जणांना केला दंड...

फोंडा शहर तसेच तालुक्यातील इतर मुख्य रस्त्यांवर फोंड्यातील वाहतूक पोलिसांनी नियमभंग केल्याप्रकरणी आतापर्यंत 42 हजार जणांना दंड केला आहे. वर्ष संपण्याअगोदर नाताळात वाहने बेपर्वाईने चालवण्याचे प्रकार होत असल्याने पुढील बारा दिवसांत त्यात वाढच होणार आहे.

फोंडा पालिकेने दिले वाहन

फोंडा शहरातील नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची वाहने उचलण्यासाठी फोंडा पालिकेने आपले वाहन दिले आहे. वाहतूक पोलिसांकडून या वाहनाचा वापर होत असून त्यामुळे बेपर्वाईने वागणाऱ्या वाहनचालकांना जरबच बसला आहे.

सुंदर फोंड्यासाठी प्रयत्न- रितेश नाईक, नगराध्यक्ष

फोंडा पालिका क्षेत्र आणि फोंडा शहर सुंदर करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. विशेष म्हणजे वाहतुकीच्याबाबतीत सुटसुटीतपणा आणताना वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी पालिकेने वाहतूक पोलिसांना आवश्‍यक सहकार्य केले आहे. फोंड्यातील विविध योजना आणि उपक्रम यामुळे नजीकच्या काळात फोंड्याचे वेगळे रूप फोंडावासीयांना दिसेल हे नक्की.

वाहनचालकांनी शिस्तीत वागावे- कृष्णा सिनारी, निरीक्षक, वाहतूक पोलिस फोंडा

फोंड्यातील वाहतूक कोंडीची व इतर समस्या दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आपल्यापरीने प्रयत्न चालवले आहेत. फोंडा पालिकेचे सहकार्य मिळत आहे, त्याचप्रमाणे वाहनचालक व प्रवासी वर्गाचेही तेवढेच मोलाचे सहकार्य मिळणे आवश्‍यक आहे. तरच वाहतुकीच्या अनेक समस्या सोडवणे सोपे होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT