Ganesh Temple  Dainik Gomantak
गोवा

नवसाला पावणारा फर्मागुढीतील गोपाळ गणपती

दोनशे वर्षांचा इतिहास : पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी केला मंदिराचा जीर्णोद्धार

गोमन्तक डिजिटल टीम

Farmagudi Ganesh Temple: छोटेसे पण सुबक, सुंदर असे गोपाळ गणपतीचे देवालय, रमणीय परिसर आणि समोर महामार्ग. त्याच्या बाजूला समोर टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आणि अश्‍वारूढ पुतळा...पर्यटनाला साजेसे वातावरण आणि प्रत्यक्ष गोपाळ गणपतीचा अधिवास, असे एकंदर फर्मागुढीचे चित्र.

नवसाला पावणारा गणपती म्हणून हे देवालय प्रसिद्ध आहे. केवळ गोवाच नव्हे, तर देश-विदेशातील भाविकही या मंदिरात दर्शनाला येतात. एका परीने पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेल्या फर्मागुढी परिसरातील या गोपाळ गणपतीच्या मंदिराची प्रसिद्धी सर्वदूर झाली आहे.

सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास या मंदिराला आहे. पूर्वी फर्मागुढीच्या टेकडीवर गुराखी गुरे चरायला घेऊन येत. एके दिवशी झुडपात एका गुराख्याला गणपतीची पाषाणाची मूर्ती दिसली. त्याने ती आपल्या सहकाऱ्यांना दाखवली.

ही वार्ता फर्मागुढी आणि परिसरातील गावामध्ये पसरली. लोकांनी प्रत्यक्ष येऊन मूर्ती पाहिली आणि शेवटी निर्णय झाला. गावच्या जल्मींच्या हस्ते मूर्तीची स्थापना एका छोट्याशा झावळ्यांच्या मंदिरात करण्यात आली आणि गुराखी अर्थातच राखणे गणपतीच्या सेवेत रूजू झाले.

आज ज्या ठिकाणी मंदिराची तुळस आहे, त्याच ठिकाणी हे झावळ्यांचे छोटेखानी मंदिर उभारले होते. नित्य पूजाअर्चेसह भाविकांनी गणेश चतुर्थी उत्सवही सुरू केला. हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत असतो.

या उत्सवात वार्षिक सत्यनारायण महापूजा जल्मींच्या हस्ते करण्यास सुरवात झाली, जी आजतागायत सुरू आहे. राखण्यांना गणपतीची पाषाणी मूर्ती सापडली आणि मंदिर उभारण्यासाठी राखण्यांनी सुरवातीला प्रयत्न केले, त्यामुळेच या स्थळाचे नाव गोपाळ गणपती असे पडले.

या मंदिर समितीचे अध्यक्ष कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आहेत. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मंदिर उभारण्याचे योजले आहे.

मुख्यमंत्री भाऊसाहेबांनाही आली अनुभूती

कालांतराने या गणपतीची महती गोव्याचे पहिले मुख्यमंत्री तथा मगोपचे नेते भाऊसाहेब ऊर्फ दयानंद बांदोडकरांपर्यंत पोचली. त्यांनी फर्मागुढीला भेट दिली आणि झावळ्याच्या मंदिरातील श्रींचे दर्शन घेतले.

नंतर बांदोडकर पुन्हा फर्मागुढीला आले आणि त्यांनी श्रींचे दर्शन घेतले व राखण्यांना आपण जे मनात योजले होते, ते गणपतीच्या कृपेने आणि आशीर्वादाने पूर्ण झाल्याचे सांगितले.

भाऊसाहेबांनी राखण्यांशी चर्चा करून गणपतीचे मंदिर उभारण्याची मनीषा व्यक्त केली. मग सुबक, सुंदर असे मंदिर उभारले गेले. मंदिरात २० मे १९६६ रोजी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली.

बाराही महिने उत्सव

या देवस्थानात चैत्र ते फाल्गुन मासापर्यंत अनेक उत्सव होतात. संकष्टी तसेच विनायकी उत्सव हे कायम असून भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो. भाविकांना स्वहस्ते अभिषेकाची संधी असून निवासाचीही सोय उपलब्ध आहे.

विशेष म्हणजे, मंदिराची सुसज्ज अशी सभागृहे मंगलकार्य तसेच इतर कार्यक्रमांसाठी उपलब्ध असतात. मंदिराचा वर्धापनदिन, तसेच गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT