Colvale Jail गोव्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याचे अहवाल अधूनमधून येतात. सरकारी नोकऱ्यांसाठी तरुणांची अक्षरश: झुंबड उडालेली दिसते. सरकारी नोकऱ्यांसाठी तरुण राजकारण्यांच्या वळचणीला जातात, इथपर्यंत ठीक आहे.
पण जर कैदीच सरकारी नोकऱ्यांची मागणी करू लागले तर? हो, असे घडलेय. कोलवाळ जेलमधील एका कैद्याने चक्क सरकारी नोकरीची मागणी केलीय.
त्याचे झाले असे की, कैद्यांनी जेलमध्ये पाच दिवसांच्या गणपतीचे पूजन केले आहे. याचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना प्रतिक्रिया देताना एका कैद्याने सरकारकडे नोकरीची मागणी केली. त्या कैद्याचे नाव विनेश फळदेसाई (रा.बाळ्ळी) असे आहे.
पत्रकारांशी बोलताना विनेश म्हणाला, लोकांच्या मनात कैदी म्हणजे गुंड अशी भावना असते. परंतु येथे कोणीच अजमल कसाबसारखे दहशतवादी नाहीत. मी कारागृह अधिकाऱ्यांनाही संदेश देऊ इच्छितो की, जर कोणाबद्दल कोणी काही सांगितले तर त्यावर चटकन विश्वास ठेवू नये.
येथे आम्ही सर्वजण एकोप्याने राहतो. भांडण करत नाही. अशा विचारांचे लोक मी कारागृहाबाहेरही पाहिलेले नाहीत. कैद्यांना उगाच वाईट म्हणता कामा नये. चूक घडत नाही, असे नाही. देवसुद्धा त्याला माफी करतो.
विनेशची गंभीर कृत्ये
जेलमधून बाहेर पडल्यानंतर सरकारी नोकरीची मागणी करणाऱ्या विनेशची कृत्ये गंभीर आहेत.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात विनेश जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
पूर्वी विनेश सडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता; पण तेथे गैरप्रकारांत गुंतल्याचे आढळल्याने त्याची रवानगी कोलवाळ कारागृहात केली.
विनेश हा बॉक्सर आहे. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो बॉक्सिंग स्पर्धांमध्ये सहभागीही होतो.
गेल्या 12 वर्षांपासून तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय.
14 वर्षांनंतर जन्मठेपेच्या शिक्षेचा फेरविचार केला जातो.
जर सर्व पातळ्यांवर कैदी पात्र ठरला, तरच त्याची सुटका करण्यात येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.