Dudhsagar River Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्यातील दूधसागर नदीचे पाणी पुन्हा 'लाल'

Goa News: पाणी लाल कसे होते, याचा शोध घेण्यासाठी सुभाष शिरोडकर यांनी समिती नेमूनही काहीही परिणाम झालेला नाही.

दैनिक गोमन्तक

Goa News: दूधसागर नदीचे पाणी आज पुन्हा लाल झाल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करत दाभाळवासीय संतप्त झाले. पाणी लाल कसे होते, याचा शोध घेण्यासाठी जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी समिती नेमूनही काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरण्याचा इशारा पंच रमाकांत गावकर यांनी दिला आहे.

दाभाळ येथील पंच रमाकांत गावकर आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दूधसागर नदीचे पाणी गढूळ होण्याचे प्रकार पुन्हा पुन्हा घडत आहेत. पंप बसवून दूधसागर नदीचे पाणी दाभाळ परिसरात पिण्यासाठी वापरले जाते. गेले काही दिवस लोकांच्या घरात नळाद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. स्थानिक पंच असल्याने लोकांकडून बोलणी खावी लागतात, असे गावकर म्हणाले.

दिलीप गावकर म्हणाले की, गेले महिनाभर या नदीचे पाणी लाल होत आहे. ओपा प्रकल्पातून या पाण्याचा पुरवठा विविध तालुक्यांना केला जात असल्याने गढूळ पाण्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या गढूळ पाण्याचे रहस्य जलस्रोतत खात्याने शोधून काढण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही चालढकल

सामाजिक कार्यकर्ते संदीप पारकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ओपा येथील जलशुद्धीकरण प्रकल्प, खांडेपार आणि कोडली भागांची पाहणी केली होती. त्यावेळी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गढूळ पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी नेले होते; पण त्याचा अहवाल अजून दिलेला नाही. अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

समिती कागदावरच

‘मंत्री तुमच्या दारी’ कार्यक्रमासाठी धारबांदोडा तालुक्यात जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर आले, तेव्हा दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, पंच आणि लोकांनी दूधसागर नदीचे पाणी वारंवार गढूळ होत असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी समिती निवडली व पाणी गढूळ का होते, याचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. पण त्या समितीने अजूनही अहवाल दिला नसल्याने ती समिती कागदावरच राहिल्याचे लोकांतून बोलले जात आहे.

लक्ष्मीकांत कुट्टीकर, मामलेदार-

स्थानिक लोक हे पाणी काले पंचायत क्षेत्रातून येत असल्याचे बोलतात. काले पंचायत हा भाग सांगे मामलेदारांच्या हद्दीत येत असल्याने सांगेच्या मामलेदारांना पत्र लिहून त्या जागेची पाहणी करावी, असे कळविण्यात येईल.

रमाकांत गावकर, पंच-

काले येथील एका खासगी आस्थापनाकडून गढूळ सांडपाणी वारंवार सोडले जाते. ते पाणी कालेहून करमणे नदीतून थेट दूधसागर नदीत मिसळते. त्यामुळे दूधसागर नदीचे पाणी पिण्यालायक नाही. या आस्थापनावर कारवाई करावी, यासाठी पोलिसांत तक्रार दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT