Vijay Sardesai, Francis Sardine Dainik Gomantak
गोवा

Goa Politics : विजय-सार्दिन यांच्‍यात ‘तू तू मैं मैं’; नवा वाद सुरू

Goa Politics : मतदार सोबत असल्याचा सार्दिन यांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Politics :

मडगाव, दक्षिण गोव्‍यातील इंडिया आघाडीचा उमेदवार काँग्रेस पक्षाचा की ‘आप’ पक्षाचा या मुद्यावरून यापूर्वी जो वाद झाला होता, तो आता शमला असला तरी दक्षिण गोव्‍याचे काँग्रेसचे उमेदवार कोण यावर नवीन वाद सुरू झाला आहे.

फ्रान्‍सिस सार्दिन हे उमेदवार असल्‍यास आपण त्‍यांना पाठिंबा देणार नाही, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली असतानाच मागच्‍या निवडणुकीत विजय भाजपबरोबर होते, तरी फातोर्डा मतदारसंघात मला आघाडी मिळाली असे म्‍हणत, विजयसोबत नसले तरी फातोर्डातील मतदार माझ्‍याबरोबरच रहातील, असा पलटवार सार्दिन यांनी केला आहे.

काल एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत सरदेसाई यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली होती. भाजपाला हरवायचे असेल, तर सर्व भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येऊन त्‍यांच्‍या विरोधात टक्‍कर देणे गरजेचे आहे, ही अजूनही माझी भूमिका आहे. मात्र सार्दिन काँग्रेसचे उमेदवार असल्‍यास त्‍यांना पाठिंबा देण्‍याची माझी तयारी नाही, असे ते म्‍हणाले होते.

आपली भूमिका अधिक स्‍पष्‍ट करताना सरदेसाई म्‍हणाले, सार्दिन आणि माझे संबंध पूर्वीपासून चांगले नाहीत. मी फातोर्डेचा आमदार हे मान्‍य करण्‍याची सुद्धा सार्दिन यांची तयारी नाही. आजवर त्‍यांनी आपली हीच भूमिका कायम ठेवली.

अशा परिस्‍थितीत मी त्‍यांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा कुणीही कसा धरु शकतो, असा प्रश्‍‍न सरदेसाई यांनी केला. या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्‍यातून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल त्‍यावर मी माझी भूमिका ठरविणार, गोव्‍याची भूमिका लोकसभेत प्रखरपणे मांडणारा उमेदवार आहे, असे वाटल्यास माझी त्‍याला पाठिंबा देण्‍याचीही तयारी असेल, असे ते म्‍हणाले होते.

आज मडगाव येथे फ्रान्‍सिस सार्दिन यांची पत्रकार परिषद होती. त्‍यावेळी त्‍यांना विजयच्‍या या वक्‍तव्‍याबद्दल विचारले असता, जर लोक माझ्‍याबरोबर आहेत, तर विजय असला किंवा नसला त्‍याचा काय फरक पडेल, असा प्रति सवाल सार्दिन यांनी केला.

मला काहीच फरक पडणार नाही!

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी विजय सरदेसाई हे प्रमोद सावंत यांच्‍या भाजप सरकारात मंत्री होते, असे असतानाही फातोर्डातील लोकांनी माझ्‍यासाठी मतदान केले. फातोर्डात मला आघाडीही मिळाली.

यावेळीही तसेच होणार आहे. मला उमेदवारी मिळाल्‍यास फातोर्डातील मतदार माझ्‍याच बाजूने उभे राहतील. भले विजय उभा राहिला किंवा नाही त्‍यामुळे काहीच फरक पडणार नाही, असे सार्दिन म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT