Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: पाटकर, सरदेसाईंमुळे तुटली युती; 'आरजी'ला संपविण्यासाठीच 'मास्टर प्लान', मनोज परब यांचा आरोप

Goa ZP Election: आम्ही गोव्याच्या जनतेच्या हितासाठी आमचे सर्व हेवेदावे मागे सारून युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतु युतीधर्मच पाळला गेला नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आम्ही गोव्याच्या जनतेच्या हितासाठी आमचे सर्व हेवेदावे मागे सारून युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतु युतीधर्मच पाळला गेला नाही. होय आमची होऊ घातलेली युती ही गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यामुळे तुटली, असा आरोप आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी केला.

पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार वीरेश बोरकर व अजय खोलकर उपस्थित होते. परब म्हणाले, दोन्ही पक्ष प्रमुखांना मताधिक्य मिळवू शकतो याची कल्पना होती, त्यामुळे खेळवत ठेवून आरजी संपवण्याचा मास्टरप्लान सरदेसाई, पाटकर यांनी राबवला. दरम्यान, झेडपीसाठी काँग्रेस व फॉरवर्डने राजकीय अस्तित्वासाठीच युती केली. पण तोटा ‘आरजीचा झाला, असे ‘आप’नेते वाल्मिकी नाईक म्हणाले.

फॉरवर्डकडून फुटिरांना प्रवेश! : आम्ही अनेक गोष्टीत माघार घेतली परंतु फुटिरांना पक्षात घेऊन फॉरवर्डने युती धर्म मोडला. सांताक्रुज येथे आमचे मतदार अधिक आहेत, तिथे माघार घ्यायला सांगितले गेले. आम्ही युती टिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु शक्य झाले नाही, असे वीरेश बोरकर म्हणाले.

आम्ही दिल्लीला गेलोच नव्हतो!

मी आणि विरेश बोरकर पूर्वी मुंबईला विमानाने गेलेला फोटो समाजमाध्यमांवर टाकत दिल्लीला गेल्याचे विजय सरदेसाईंना वाटावे यासाठी टाकला. त्यामागे आमचा काही सुप्त उद्देश होता. आम्हाला युतीच्या बोलणीवेळी सरदेसाईंबाबत संशंय निर्माण झाला होता म्हणून हा फोटो युरी आलेमाव यांना कल्पना देऊन टाकण्यात आला होता असे मनोज परब यांनी सांगितले.

परब यांचे आरोप बिनबुडाचे

गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी कधीही भाटकारशाही केली नाही. त्‍यांचे राजकारण नेहमीच बहुजनांच्‍या विकासाचे राहिले आहे. रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स पक्षाचे (आरजीपी) अध्‍यक्ष मनोज परब केवळ राजकीय हित साध्‍य करण्‍यासाठी त्‍यांच्‍यावर नाहक आरोप करीत आहेत, अशी टीका गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा अध्‍यक्ष दीपक कळंगुटकर यांनी केली.

पणजीतील पक्ष कार्यालयात बुधवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत मडगावच्या माजी नगराध्‍यक्षा पूजा नाईक व पक्षाचे संयुक्त सचिव विकास भगत उपस्‍थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! सुपरमार्केटमध्ये पिशवी घेवून गेला अन्…. Viral Video एकदा बघाच

अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

बहिणीच्या छातीवर बुक्की मारली, आमची लायकी काढली; मुंबईतील 13 पर्यटकांना लुथरा बंधुंच्या कल्बमध्ये मारहाण, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT