Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

पणजीत ‘फादर-सन एन्टरप्रायझेस’; उत्पल कडाडले

मोन्सेरात पिता - पुत्रावर टीकास्त्र ; 'सीएम ' ही लक्ष्य

दैनिक गोमन्तक

पणजी : पावसाळ्यात पणजी शहराची झालेली दुरवस्था पाहता उत्पल पर्रीकर यांनी आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात आणि त्यांचे सुपुत्र तथा महापौर रोहित मोन्सेरात यांच्यावर जबरदस्त हल्लाबोल केला आहे. त्यांनी या दोघांचा ‘फादर-सन एन्टरप्रायझेस’ असा उल्लेख केला आहे. या एन्टरप्रायझेसचा कारभार पणजीला बरबाद करणार असल्याची टीका उत्पल यांनी केली आहे.

एका खासगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उत्पल यांनी पणजी शहरातील रस्त्यांची अवस्था व साचणाऱ्या पाण्याची समस्येविषयी मत व्यक्त केले. पणजीत पाणी तुंबण्याच्या समस्येविषयी ते म्हणाले, मला संधी मिळाली असती तर दोन-तीन कल्पना होत्या, पण संधीच मिळाली नाही. ज्यांना लोकांनी संधी दिली, त्यांनी लोकांसाठी काही वेळ द्यावा.

सद्यस्थितीत कुठेच नेतृत्व दिसत नाही. जे निवडून आले, त्यांचा रस रिअल इस्टेटमध्ये आहे. त्यालाच ते अधिक किंमत देतात, असा टोला त्यांनी बाबूश मोन्सेरात यांचे नाव न घेता हाणला. त्याशिवाय मुख्यमंत्री सावंत यांनीही याप्रश्‍नी लक्ष घालणे अपेक्षित आहे, असे उत्पल यांना वाटते.

निवडणुका आल्या, की येतो डांबराचा वास

निवडणुका तोंडावर आल्या की, शहरात डांबराचा वास येतो. त्यामुळे त्याचा दर्जा काय असेल, हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नाही. राजधानीची अवस्था सुधारण्यासाठी व पुढील पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचू नये, याकरिता उपाय योजण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे, असे मत उत्पल यांनी व्यक्त केले.

फादर-सन एन्टरप्रायझेस पाच वर्षे असेच काम करीत राहिल्यास पणजीला राजधानी म्हणणेसुद्धा लज्जास्पद वाटेल. पर्वरीत विधानसभा परिसर आहे, तो राजधानी म्हणून जाहीर करावा लागेल.

-उत्पल पर्रीकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

Afghanistan Drone Attack: सीमेवरील गोळीबाराचा अफगाणिस्ताननं घेतला बदला! अफगाण वायूसेनेचा पाकिस्तानात घुसून मोठा हवाई हल्ला; दहशतवादी तळ उद्ध्वस्त

Goa Illegal Borewells: हायकोर्टाचा बडगा पण प्रशासनाची सुस्ती? गोव्यात अजूनही 121 बेकायदा बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा सुरुच

Goa Weather: 4 दिवसांत पाऊस न पडल्‍यास धरणांची अवस्‍था 2023 सारखी! मान्‍सूनने पाठ फिरवल्‍याने जलसाठ्यात मोठी घट

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट गडद

SCROLL FOR NEXT