मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) हे मांद्रे मतदार संघाचा दौरा करण्यासाठी येणार म्हणून भाजपा तर्फे संपूर्ण मतदार संघात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopate) यांचे ठिकठिकाणी कट आऊट आणि झेंडे लावले होते. तर मगो पक्षाने (MGP) चोपडे ते खिंड मोरजी पर्यंत झेंडे मिळेल त्या ठिकाणी लावले होते, भाजपचे झेंडे (BJP Flag) तसेच ठेवून मगोचे झेंडे (MGP Flag) हटवले. या विषयी वीज अभियंते कायतान यांच्याकडे संपर्क साधला असता आम्हाला पेडणेचे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर (Deputy Collector) यांनी वीज खांबाला व सार्वजनिक ठिकाणी मगोने लावलेले झेंडे काढण्याचा आदेश दिला, आपण मामलेदार आणि पोलिसाना पाठवतो, वीज कर्मचाऱ्यांना घेवून झेंडे काढा असे सांगितल्यामुळे आदेशाचे पालन करून आम्ही ते काढल्याचे ते म्हणाले.
उपजिल्हाधिकाऱ्यांची फोन उचलण्यास टाळाटाळ
पेडणेचे उपजिल्हाधिकारी राविशेखर निपाणीकर यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता एक रिंग जाते व त्यांचा फोन सतत बीजी मिळतो, त्यामुळे नक्की एकाच पक्षाचे झेंडे काढायला सांगितले होते कि दोन्ही पक्षाचे ते कळू शकले नाही. २४ रोजी मगोचे नेते जीत आरोलकर यांचे मगोचे कार्यालयाचे मोरजी येथे उद्घाटन होते त्यानिमित्ताने वातावरण निर्मिती करण्यासाठी चोपडे ते खिड मोरजी पर्यंत मगोने आपलेही झेंडे लावले होते, परतू सरकारी यंत्रणेने पक्षपाती धोरणाचा अवलंब करून केवळ मगोचे झेंडे काढलेले आहेत, त्याबद्दल मगो पक्षात सरकारी यंत्रणेविषयी चीड निर्माण झाली आहे. सरकारी यंत्रणेने एकाच पक्षाचे झेंडे काढल्यामुळे ज्या अधिकाऱ्याने आदेश दिला त्या अधिकाऱ्याच्या विरोधात मगो पक्ष आंदोलन करणार असल्याची माहिती जीत आरोलकर यांनी दिली. उद्या वीज खात्याला लेखी पत्र देवून कोणी आदेश दिला आणि कोणी कोणी झेंडे काढले त्याची माहिती घेवून आठ दिवसानंतर अधिकाऱ्याच्या विरोधात रस्त्यावर येणार असल्याचे सांगितले.
आमदारचा पराभव दिसू लागल्याने कृती; राघोबा गावडे
मगोचे केंद्रीय सदस्य आणि मांद्रेचे माजी सरपंच राघोबा गावडे यांनी प्रतिक्रिया देताना अधिकारी राजकर्त्यांच्या हातातले बाहुले बनले आहे, राजकर्ते जसे सांगतील तसे ते वागतात. मान्द्रेच्या आमदाराला आपला पराभव दिसू लागल्यामुळे केवळ मगोचे झेंडे काढण्यासाठी अधिकाऱ्यावर दबाव आणला, हे कृत्य निषेधार्थ आहे, दोन्ही पक्षाचे सार्वजनिक ठिकाणी किंवा मालमत्तेची नुकसानी करून जर ते झेंडे लावले असते तर बरोबर काढले असते तर काहीही हरकत नव्हती. आता मगो पक्षाला अधिकाऱ्याविरोधात आवाज उठववाच लागेल असा इशारा दिला.
झेंडे हटवण्याचा आदेश लेखी, फोनद्वारे, मॅसेजद्वारे
दोन्ही पक्षाचे सकाळी 9 वाजल्यापासून झेंडे एकाच ठिकाणी फडकत होते, काही काळ वाटल कि मुख्यमंत्री डॉक्टर सावंत मोरजीत येत असल्याने त्याच्या स्वागतासाठी मगोचे झेंडे आहेत कि काय असा भास होत होता. सकाळी साडे नऊ नंतर झेंडे हटवण्याचा आदेश मिळाला , तो आदेश लेखी कि फोन द्वारे कि संदेश यांची माहीती मगो लेखी स्वरूपात घेणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.