Goa: काँग्रेस पक्ष व स्थानिक नागरिक नील ध्वज मानांकनाच्या भू रेखाटनास करणार विरोध

मुरगाव काँग्रेस गटाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली माहिती (Goa)
काँग्रेस गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर सोबत इतर (Goa)
काँग्रेस गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर सोबत इतर (Goa)प्रदीप नाईक / दैनिक गोमन्तक
Published on
Updated on

Goa: मुरगाव, वास्को, बायणा समुद्रकिनाऱ्यावर नील ध्वज मानांकन (Blue Flag Rating) करून राज्य भाजप सरकार जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करीत आहे. नील ध्वज मानांकन केल्यास नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यापासून रोखण्यात येईल. तसेच या भागातील मच्छिमार व्यावसायिकांना आपला व्यवसाय कायमस्वरूपी बंद करून तेथून जावे लागणार आहे. हे सरकार जनतेच्या जीवावर उठलेले असून बायणा समुद्रकिनाऱ्यावर काँग्रेस पक्ष व स्थानिक नागरिक नील ध्वज मानांकनाच्या भू रेखाटन करण्यास तीव्र विरोध (Opposing the Topography) करणार असल्याची माहिती गोवा प्रदेश काँग्रेस (Goa Pradesh Congress) समितीचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी दिली.

काँग्रेस गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर सोबत इतर (Goa)
Goa: सरकारची वाट न बघता काँग्रेस कार्यकर्त्यांचा रस्ता दुरुस्तीसाठी पुढाकार

वास्को बायणा येथील मुरगाव काँग्रेस गटाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती गोवा काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मुरगाव काँग्रेस गटाध्यक्ष महेश नाईक, मुरगावच्या नगरसेविका सौ. श्रद्धा आमोणकर, सौ. योगिता पार्सेकर, शंकर पोळजी, सचिन भगत, शेखर दाभोळकर, सॅबी डिसोझा उपस्थित होते.

काँग्रेस गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर सोबत इतर (Goa)
Goa Murder Case: चौकशीत राजकीय हस्तक्षेप नकोच

राज्य काँग्रेस पक्ष व स्थानिक मच्छीमार तीव्र विरोध करणार आहेत

पुढे बोलताना काँग्रेस उपाध्यक्ष आमोणकर म्हणाले की, राज्य सरकारने गोव्यातील एकूण पाच समुद्रकिनार्‍यावर नील ध्वज मानांकन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात मुरगाव वास्को बायणा समुद्र किनाऱ्याचा सुद्धा समावेश आहे. राज्य सरकारने बायणा समुद्रकिनाऱ्यावर नील ध्वज मानांकन करण्यासाठी निविदा काढण्यासाठी हालचाली सुरू केले असून राज्य काँग्रेस पक्ष व स्थानिक मच्छीमार बंधू नागरिक तीव्र विरोध करणार आहेत. बायणा समुद्रकिनाऱ्यावर नील ध्वज मानांकन केल्यास या समुद्रावर जाण्यासाठी प्रत्येकांना पैसे मोजावे लागणार. वाहन पार्क करण्यासाठी सुद्धा अतिरिक्त पैसे द्यावे लागणार. एका प्रकारे संपूर्ण बायणा समुद्रकिनारा खाजगी स्वरूपाचा होणार आहे. यामुळे येथील मच्छिमार व्यवसायिकांना आपल्या व्यवसाय बंद करावा लागणार. तसेच काटेबायणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्पाला सुद्धा निल ध्वज मानांकनाचा जबरदस्त फटका बसणार असल्याची माहिती आमोणकर यांनी दिली.

काँग्रेस गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर सोबत इतर (Goa)
संशयास्पद मृत्यू : ‘कंचना-3’मध्ये आलेक्झेंड्राने साकारली होती भूमिका

राज्य सरकारचा ५ समुद्रकिनारे डेन्मार्क राष्ट्राला खाजगी स्वरूपात देण्याचा प्रयत्न

नील ध्वज मानांकन करून राज्य सरकार गोव्यातील ५ समुद्रकिनारे डेन्मार्क राष्ट्राला खाजगी स्वरूपात देण्याचा प्रयत्न करीत आहे (Privatization of beaches). डेनमार्क राष्ट्र या ठिकाणी नील ध्वज मानांकन करण्यासाठी चेन्नईतील आस्थापनाला कंत्राट देणार आहे. यामुळे भविष्यात बायणा समुद्रकिनारी हिंदू बांधवांना चतुर्थी सणात गणेश विसर्जन करण्यापासून रोखण्यात येईल. तसेच बायणा समुद्रकिनाऱ्यावर आणखीन काही धार्मिक स्थळे आहेत त्यांनासुद्धा येथे धार्मिक विधी करण्यापासून रोखण्यात येईल अशी माहिती आमोणकर यांनी दिली.

काँग्रेस गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर सोबत इतर (Goa)
Goa: कोळसा प्रदूषणाच्या पहाणीसाठी केंद्रीय तपास पथक एम पी टीमध्ये दाखल

पर्यटन दृष्ट्या आर्थिक फायदा व्हावा यासाठी मांडला होता प्रस्ताव...

वास्को रवींद्र भवन मध्ये शनिवार (दि.२१) रोजी एका लोकप्रतिनिधी वास्को बायणा समुद्रकिनारी पर्यटन दृष्ट्या या भागाचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी येथे नील ध्वज मानांकन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यात उपस्थित वास्कोतील विविध उद्योजकांनी नील ध्वज मानांकन प्रस्तावाला होकार दिला होता. बायणा समुद्रकिनारी नील ध्वज मानांकन करून राज्याच्या महसुलात वाढ होणार अशी माहिती येथील उपस्थित एका बार्ज मालकाने दिली होती. नील ध्वज मानांकन बायणा समुद्रकिनाऱ्यावर आणल्यास वास्को वासियांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार अशीही माहिती यावेळी अनेकांनी बोलून दाखवले होते.

काँग्रेस गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर सोबत इतर (Goa)
Goa BJP: डिचोली भाजप ओबीसी मोर्चा समिती जाहीर

नील ध्वज मानांकनामुळे समुद्राच्या दहा मीटरपर्यंत सरकारी कायदा लागू होणार नाही

राज्य सरकार गोव्यात फक्त जनतेच्या विरोधातील प्रकल्प आणून एका प्रकारे जनतेचा छळ करीत असल्याचा आरोप समाजसेवक शंकर पोळजी यांनी पत्रकार परिषदेतून केला. नील ध्वज मानांकन बायणा समुद्र किनाऱ्यावर आल्यास याचा पर्यावरणाला त्रासदायक ठरेल कारण नील ध्वज मानांकन केल्यास सर्वप्रथम बायणा समुद्र किनाऱ्यावरील वाळू पूर्णपणे सफेद करण्यात येईल व नील ध्वज मानांकनाला समुद्राचे पाणी हिरवे करावे लागणार. समुद्राच्या दहा मीटरपर्यंत त्यांना कोणताही सरकारी कायदा लागू होणार नाही.

काँग्रेस गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर सोबत इतर (Goa)
Goa: बेकायदा बांधकाम पाडले बंद

संरक्षक भिंत उभरल्यामुळे एकप्रकारे किनाऱ्याला खाजगी स्वरूप येईल अशी भीती

समुद्रकिनारी मोठी संरक्षक भिंत उभारण्यात येईल. त्यामुळे संपूर्ण बायणा समुद्रकिनारा एका प्रकारे खाजगी होणार. नील ध्वज मानांकनाला गोव्यातील वेलसाव, मिरामार समुद्रकिनाऱ्यावर आणलेल्या नागरिकांनी विरोध केला आहे. आता काँग्रेस पक्ष व मुरगाव नगरपालिकेचे प्रभाग ८,९ मधील जनतेबरोबर नगरसेवक सुद्धा विरोध करणार असल्याची माहिती शेवटी गोवा प्रदेश उपाध्यक्ष आमोणकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com