Goa Politics : Maharashtrawadi Gomantak Party & BJP Dainik Gomantak
गोवा

राज्यात भाजप - मगो युतीबाबत जोरदार चर्चा

राज्यात युतीसंदर्भात हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे..

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्‍वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) येऊन गेल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे आज आगमन होणार आहे. तसेच राज्यातील भाजप सरकार घडवण्यात नेहमीच पुढाकार घेणारे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेही उद्या 1 नोव्हेंबरला गोव्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात भाजप - मगो युतीबाबत (Goa Politics) जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या उद्याच्या आगमनापूर्वी मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी काही अटींवर भाजपशी युती करण्याची तयारी दर्शविलीआहे. त्यामुळे राज्यात युतीसंदर्भात हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. गडकरी आणि ढवळीकर यांची घनिष्ठ मैत्री आहे. त्यामुळे ते मगो नेत्यांशी चर्चा करून त्यांचे मन वळविण्यासंदर्भात प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2017 साली राज्यात भाजपचे सरकार घडविण्यासाठी प्रादेशिक पक्षांना एकत्र करण्याची किमया गडकरी यांनी साधली होती. तेव्हा त्यांनी मगोच्या आमदारांना हाताशी धरून सरकार घडवून आणले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT