पणजी: इंधन दरवाढीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या आठवडाभरात राज्यातील पेट्रोलच्या दरात 2.63 पैशांची तर डिझेलच्या दरात 1.72 पैशांची वाढ झाली. काल रविवारी पणजीत पेट्रोल 35 तर डिझेल 37 पैशांनी वधारले.
ऐन सणासुदीत वाढणाऱ्या इंधन दरामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सणाच्या सुट्टीनिमित्त स्वत:च्या वाहनातून लांबचे दौरे, सहलीचे आयोजन करताना लोकांच्या खिशावर नक्कीच ताण येणार आहे.
मागच्या आठवड्यात सलग चार दिवस इंधन दर स्थिर होते. त्यानंतर पाचव्या दिवशी 2.63 पैशांची वाढ झाली. गेल्या दहा महिन्यांपासून इंधनाचे दर झपाट्याने वाढत असल्याने वाहनधारकांच्या खिशाला चाट लागत आहे. दुसरीकडे डिझेलचे दर वधारल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि साहित्याच्या भाववाढीवर होत आहे.
एकीकडे कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. अनेक व्यवसायांवर संकट ओढवले आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर आता कुठे नागरिक स्थिरस्थावर होत असताना आता महागाई त्यांना डोके वर काढू देत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आपल्या शहरातील आजची एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जावू शकता. या वेबसाईटवर कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.