Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa MLA Disqualification Case: आमदार अपात्रता प्रश्‍नी सभापतींची सुनावणी पूर्ण; नोरोन्हा यांच्या याचिकेवर 25 ऑक्टोबरला निवाडा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Politics News: काँग्रेसमधून राजीनामा न देताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांविरोधातील अपात्रता याचिकेवरील सुनावणी सभापती रमेश तवडकर यांनी पूर्ण केली. २५ ऑक्टोबरपर्यंत ते निवाडा देणार आहेत.

ही याचिका काँग्रेसचे डॉमनिक नोरोन्हा यांनी सादर केली होती. या निवाड्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या याचिकेवर सभापती सुनावणी सुरू करणार आहेत. आमदार कामत आणि लोबो यांना अपात्र ठरविण्याची याचिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सादर केली होती.

चोडणकरांच्या याचिकेवर १० नोव्हेंबरला सुनावणी

मणिपूर प्रकरणात अपात्रतेच्या याचिकांवर सभापतींनी ९० दिवसांत निकाल देणे बंधनकारक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्याचा आधार घेत चोडणकर यांनी असाच आदेश गोव्याच्या सभापतींना द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सभापती निकाल देतील, अशी अपेक्षा व्यक्त करत चोडणकर यांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी १० नोव्हेंबरला ठेवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalarang 2024: गोव्यात पाच दिवस रंगणार ‘कलारंग महोत्सव’! 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या हस्ते होणार उदघाट्न

Goa Recruitment: शाळांसाठी शिक्षण खात्याच्या मीडिया साइटवर भरतीची जाहिरात अपलोड करणे आवश्यक !!

Sao Jose De Areal: ‘स्वच्छता ही सेवा!’ 'सां जुझे दी आरियाल'चा जागृती कार्यक्रम; कृषी, मच्छीमारी, पशुसंवर्धन खात्यांचा सहभाग

Mayem News: भाजीचे मळे फुलणार, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हसू येणार; मये होणार ‘कृषी’समृद्ध

Moti Dongor: 'मोती डोंगर'बाबत काय म्हणाले दिगंबर कामत? पहा...

SCROLL FOR NEXT