Goa politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

Manoj Parab’s RGP Opens Alliance: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेव्होल्युशनरी गोअन्स पार्टी सक्रिय झाली असून, पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी महत्त्वपूर्ण राजकीय घोषणा केली

Akshata Chhatre

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेव्होल्युशनरी गोअन्स पार्टी (RGP) सक्रिय झाली असून, पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी महत्त्वपूर्ण राजकीय घोषणा केली आहे. भाजपने सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आरजीपीने इतर विरोधी पक्षांसोबत युतीचे दरवाजे उघडले असून, या संदर्भात लवकरच औपचारिक चर्चा सुरू होणार आहे. युतीसाठी 'गोव्याचे हित' हीच आरजीपीची मुख्य अट असेल, असे मनोज परब यांनी स्पष्ट केले आहे.

युतीसाठी 'गोव्याचे हित' हीच मुख्य अट

पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी स्पष्ट केले की, आरजीपी इतर विरोधी पक्षांसोबत युतीसाठी तयार आहे, पण ती 'सशर्त युती' असेल. या युतीची मुख्य अट 'गोव्याचे हित' असेल आणि आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करणे हेच या युतीचे प्रमुख लक्ष्य असेल.

आरजीपीच्या प्रमुख मागण्या:

  • म्हादई नदीचा मुद्दा

  • पोगो कायदा (POGO Act)

  • जमीन हक्क कायदा

जर आम आदमी पार्टी (AAP), काँग्रेस (Congress), आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) यांसारख्या विरोधी पक्षांनी वरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर होकार दिला, तरच आरजीपी युतीचा विचार करेल. मनोज परब म्हणाले, "सध्या विधानसभेत आरजीपीचा एक आमदार आहे आणि १०% वाटा आहे. भाजप आणि काँग्रेसनंतर आरजीपी हाच मोठा पक्ष आहे, त्यामुळे कोणीही आम्हाला कमी लेखू नये."

पक्षासोबत चर्चा झाल्यावरच आमदार विजय सरदेसाई यांच्याशी युती संदर्भात बोलणे केले जाईल, असेही परब यांनी स्पष्ट केले. युतीची पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी लवकरच केंद्रीय कार्यकारी मंडळ (CEC), निवडणूक समिती (Election Committee) आणि पक्षाच्या विविध आघाड्यांसोबत बैठक घेतली जाईल. मनोज परब यांच्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांमध्ये भाजपविरोधी महाआघाडी तयार होण्याच्या शक्यतांना बळ मिळाले आहे. आगामी काही दिवसांत गोवा राजकारणाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Temba Bavuma Record: बावुमाचे 'मिशन वर्ल्ड रेकॉर्ड'! गुवाहाटीत भारताला हरवून इतिहास रचण्याची संधी, जे कुणालाच नाही जमलं ते करुन दाखवणार

नावेलीत मांस दुकानात गायीचे कापलेले शिर आढळल्याने खळबळ, दुकानदाराला अटक, नंतर जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

SCROLL FOR NEXT