Ponda By-Election Dainik Gomantak
गोवा

Ponda By-Election: फोंड्यात आता भाजपविरुद्ध भाटीकर? भाजपची संपूर्ण प्रचार यंत्रणा रिंगणात; काँग्रेसचे सावध डावपेच

फोंड्याच्या पोटनिवडणुकीला सध्या एक वेगळीच लय प्राप्त झाली असून डाव-प्रतिडाव रंगताना दिसत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: फोंड्याच्या पोटनिवडणुकीला सध्या एक वेगळीच लय प्राप्त झाली असून डाव-प्रतिडाव रंगताना दिसत आहे. भाजपची संपूर्ण प्रचार यंत्रणा फोंड्यात दिसत असून काँग्रेस पक्षापेक्षा उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनाच टार्गेट केले जाऊ लागले आहे. त्यामुळे या लढतीला ‘भाजप’विरुद्ध ‘भाटीकर’ असे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे.

माजी खासदार तथा माजी मंत्री विनय तेंडुलकर यांनी काल दिल्लीहून येताच थेट फोंडा गाठले आणि प्रचाराला सुरवात केली. यंदाच्या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपने केलेला टीमवर्क. भाजपचे कमीत-कमी चार संच तरी वेगवेगळ्या स्वरूपात प्रचार करताना दिसत आहेत.

शुक्रवारी माजी सभापती ॲड. विश्वास सतरकर, पेडण्याच्या नगराध्यक्षा उषा नागवेकर हे भाजपच्या कार्यकर्त्यांसह घरोघरी प्रचार करताना दिसत होते. मुख्यमंत्र्यांनी तर प्रचाराची राळ उडवली असून शुक्रवारी त्यांनी सलग सहा कोपरा बैठकांना संबोधित केले.

माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे हेही स्वतंत्ररीत्या फिरत असून मतदारांना लुभावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यामुळे सध्यातरी भाजपने वातावरण निर्मिती करण्यात यश मिळविल्याचे दिसत आहे. ‘इधर देखो उधर देखो सभी जगह भाजपही भाजप’ अशी फोंड्यात सध्या परिस्थिती असून आता याचा प्रभाव मतदारांवर किती पडतो, हे मात्र बघावे लागेल.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसने सावध पावले टाकायला सुरवात केली असून भाजपच्या या ‘वादळा’ला ‘घर घर अभियान’चे अस्त्र वापरून तोंड द्यायला सुरवात केली आहे. गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी फोंड्यातच तळ ठोकला असून तेही घरोघरी फिरताना दिसत आहेत. काँग्रेसने ही पोटनिवडणूक गांभीर्याने घेतलेली दिसत असून त्याचा प्रत्यय त्यांच्या प्रचाराच्या वेळी येत आहे.

दरम्यान, भाजप व काँग्रेसच्या मानाने कमजोर वाटणाऱ्या आम आदमी पक्षानेही प्रचारात जोरदार मुसंडी घेतली असून अनेक मुस्लिम महिला या पक्षाचा झेंडा घेऊन फिरताना दिसत आहेत. आता ही वस्तुस्थिती आहे का ‘आभास’, हे कळायला मात्र निकालाची वाट पाहावी लागणार आहे, एवढे निश्चित.

गिरीश चोडणकर केरळ दौऱ्यावर

फोंड्यात राजकीय वातावरण तप्त होत असताना आणि भाजप आपल्या पूर्ण ताकदीनिशी लढत असताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर मात्र सध्या केरळ दौऱ्यावर आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

गिरीश हे भंडारी समाजाचे असल्यामुळे आणि भाजपचा उमेदवारही भंडारी समाजाचा असल्यामुळे गिरीश काँग्रेसकरता प्रमुख ‘सहारा’ बनू शकले असते, असे बोलले जात आहे. गोव्यात पोटनिवडणूक असताना गिरीशना केरळला पाठविण्यामागे काही ‘सेटिंग’ तर नसावे ना, असा संशयही व्यक्त केला जात आहे. आता खरे काय आणि खोटे काय, हे देवच जाणो.

गावडेंचे मुस्लिम मतदार मिशन

मुस्लिम धर्मीय मतदार सहसा भाजपला मतदान करत नाहीत, असा प्रवाद असल्यामुळे प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी मुस्लिम मतदार मिशन ठेवले असून त्यांनी मुस्लिम मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केली आहे. आपल्याला मुस्लिम बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते सांगत असले तरी खरे उत्तर निकालादिवशीच मिळणार आहे.

एकंदरीत ही पोटनिवडणूक म्हणजे ‘आ देखे जरा किस मे कितना है दम’ असे व्हायला लागले असून कोणाची नाव किनाऱ्याला लागते, यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT