Damu Naik Statement Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'त्याचा' फटका विधानसभेत बसणार नाही! मतांच्या टक्केवारीतून जनतेने भाजपलाच कौल दिला; दामू नाईक

Damu Naik on assembly impact: मतदारसंघांतील पराभवाचा भाजपच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवर कोणताही परिणाम होणार नाही

Akshata Chhatre

vote percentage analysis goa: २०२०च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने हळदोणा, शिरसई, सेंट लॉरेन्स, बेतकी-खांडोळा, दवर्ली, गिरदोली आणि खोला अशा जागा जिंकल्या होत्या, यावेळी मात्र काँग्रेस, आरजीपी आणि अपक्ष उमेदवारांनी या मतदारसंघांत भाजपचा पराभव केला.

या पराभवामुळे मंत्री बाबूश मोन्सेरात, नीळकंठ हळणकर, आमदार उल्हास कुयेकर तसेच भाजप सरकारात असलेले अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या कामगिरीकडे आपण कसे पाहता? आणि याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत होईल का? असे प्रश्न पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना विचारले.

त्यावर बोलताना 'या मतदारसंघांतील पराभवाचा भाजपच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवर कोणताही परिणाम होणार नाही. मुळात या निवडणुकीच्या माध्यमातून गोमंतकीय जनतेने आपला कौल भाजपकडेच असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहे', असे नाईक म्हणाले.

'२०२०च्या जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी राज्यात कोविडचा फैलाव झालेला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवली होती, त्यावेळी पक्षाला ३९.९३ टक्के मते मिळालेली होती. यंदा मात्र भाजपला ४०.९६ टक्के इतके मिळालेली आहेत. यातून गोमंतकीय जनतेला राज्यात भाजपचेच सरकार हवे असल्याचे दिसून येते, त्यामुळे काही मतदारसंघांतील पराभवाचा कोणताही फटका भाजपला विधानसभा निवडणुकीत बसणार नाही', असेही त्यांनी नमूद केले.

असे म्हणता येणार नाही!

सासष्टीतील ख्रिस्ती मतदारांनी भाजपला नाकारले का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, सासष्टीतील मतदारसंघांत भाजपने उमेदवार ठेवलेले नव्हते, तेथील अपक्षांना पाठिंबा देऊ इतकेच आम्ही जाहीर केले होते. परंतु, कुणाला पाठिंबा देणार हे मात्र जाहीर केले नव्हते. त्यामुळे तेथील मतदारांनी भाजपला नाकारले असे म्हणता येणार नाही. असेही दामू नाईक म्हणाले.

अध्यक्ष, उपाध्यक्ष सात जानेवारीपूर्वी ठरणार!

जिल्हा पंचायतींच्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कालावधी ७ जानेवारी २०२६ पर्यंत आहे. त्याआधी दोन्हीही जिल्हा पंचायतींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ठरतील आणि त्यांच्या नावांची घोषणा केली जाईल, असेही दामू नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT