Goa Politics: "ते म्हणणं शाब्दिक अर्थाने घेऊ नका", सत्यविजय नाईकांचे 'बॅकस्टॅबिंग'; दामू नाईकांचे स्पष्टीकरण

BJP Davorlim Candidate: निवडणुकीच्या निकालानंतर अनेकदा भावना अनावर होतात आणि त्यातून अशी विधाने येतात
backstabbing remark Goa
backstabbing remark GoaDainik Gomantak
Published on
Updated on

backstabbing remark controversy goa: दवर्ली जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार फ्लोरिडा फर्नांडिस यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर भाजपचे सत्यविजय नाईक यांनी आपल्याच कार्यकर्त्यांवर फसवणुकीचा आरोप केला होता. यावर स्पष्टीकरण देताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, "सत्यविजय नाईक यांनी वापरलेला 'पाठीत खंजीर खुपसणे' हा शब्द शाब्दिक अर्थाने घेऊ नये. निवडणुकीच्या निकालानंतर अनेकदा भावना अनावर होतात आणि त्यातून अशी विधाने येतात. ती एक तात्कालिक प्रतिक्रिया होती."

भाजपच्या मतांमध्ये मोठी वाढ

दामू नाईक यांनी आकडेवारीचा दाखला देत सांगितले की, दवर्लीत भाजपचा प्रभाव कमी झालेला नाही, उलट तो वाढला आहे. "पूर्वी या भागात भाजपला केवळ १,००० ते २,००० मते मिळायची, मात्र २०२५ च्या या निवडणुकीत भाजप उमेदवाराने ५,५८९ मते मिळवली आहेत. हा आकडा दर्शवतो की पक्ष सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला, असे म्हणणे चुकीचे ठरेल," असे त्यांनी स्पष्ट केले.

backstabbing remark Goa
Goa Politics: 'विधानसभेला काँग्रेस आमदार फुटतील, भाजप-मगोपला 22 जागा मिळतील'! ढवळीकरांचे भाकित; कार्यकर्त्यांवर उधळली स्तुतीसुमने

कार्यकर्त्यांवर विश्वास कायम

पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही, असे सांगत दामू नाईक यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत वाद मिटवून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दवर्लीतील पराभवाचे विश्लेषण केले जाईल, मात्र कार्यकर्त्यांनी खचून न जाता तळागाळातही काम सुरू ठेवावे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com