मंत्री माविन गुदिन्हो दैनिक गोमन्तक
गोवा

Goa Politics: 'रिकामे भांडे आवाज करी' असाच विरोधकांचा दावा; मंत्री माविन गुदिन्हो

लोकांना स्थिर व विकास करणारे सरकार हवे आहे, भाजपाकडे केंद्रात आणि राज्यातही योग्य असे नेतृत्व आहे. मात्र इतर पक्षांकडे ते नाही. असा दावा मंत्री गुदिन्हो यांनी केला.

Dainik Gomantak

Goa Politics: गोव्यात नवनवे पक्ष येत आहेत, त्याच्यासह येथे असलेले पक्षही आपण अमुक जागा लढवणार, अमुक जागा जिंकणार, सरकार बनवणार. असे दावे करत आहेत. या पक्षांचे दावे म्हणजे 'रिकामे भांडे आवाज करी!' या म्हणीप्रमाणे असून त्यांना फक्त माध्यमात हवा तयार करायची आहे. प्रत्यक्ष काहीही घडणार नाही. येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे .असा दावा पंचायत व वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी आज केला.

पर्वरी येथे पत्रकारांनी माविन गुदिन्हो यांना सध्या गोव्यात घडत असलेल्या विविध राजकीय घटनाबाबत विचारले असता गेली चाळीस वर्षे सातत्याने निवडून येणारे ज्येष्ठ नेते गुदिन्हो म्हणाले की पालिका निवडणुकीच्या वेळीही विरोधक गोव्यातील जनता भाजपला कंटाळली आहे व बदल घडणार आहे, असे सांगत होते. तरीही भाजपने सर्व पालिका जिंकल्या.

जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या वेळीही असेच सांगितले जात होते. नकारार्थी प्रचार केला जात होता. तरीही पहिल्यांदाच भाजपने दोन्ही जिल्हा पंचायतीवर स्पष्ट बहुमत मिळवले. येत्या निवडणुकीत सुद्धा भाजपाच स्पष्ट बहुमत मिळणार आहे. असा दावा माविन गुदिन्हो यांनी केला. लोकांना स्थिर व विकास करणारे सरकार हवे आहे. भाजपाने लोक कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या असून गोव्याचा विकास केलेला आहे. भाजपाकडे केंद्रात आणि राज्यातही योग्य असे नेतृत्व आहे. इतर पक्षाकडे ते नाही. असा दावा गुदिन्हो यांनी यावेळी केला.

लुईझीन फालेरो यांच्या तृणमूल काँग्रेस प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले की एखाद्या नेत्याला पक्षात असुरक्षित वाटते तेव्हा तो सुरक्षित जागा शोधतो. पण फालेरो यांनी शोधलेली जागा मात्र सुरक्षित नसल्याचे सांगून ते गोव्यासाठी त्याग केल्याचे सांगतात मात्र त्यांनी गोव्यासाठी काय त्याग केला ते त्यांचे त्यांनाच माहीत .असा टोमणाही माविन गुदिन्हो यांनी मारला.

तृणमूल काँग्रेस गोव्यात आली तर त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे.नवनवे पक्ष गोव्यात मोठमोठ्या घोषणा करत आहेत त्यांनी फक्त माध्यमात हवा तयार होईल व नकारार्थी प्रचारही सोशल मीडियावर होईल . प्रत्यक्षात भाजपाच्या कार्यकर्त्यांचे जाळे इतके घट्ट आहे की गोव्यात भाजप आता मजबूत स्थितीत असल्याचेही माविन गुदिन्हो यावेळी म्हणाले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT