राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात (Goa Assembly Election 2022) विविध राष्ट्रीय पक्षांच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी तसेच शिवसेना (Shivsena) नेते व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे गोवा राज्य संपर्क नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज गोवा दौऱ्यावर येत आहेत. या भेटीदरम्यान ते पक्षाच्या बैठका तसेच पक्षाची तयारी याचा आढावा घेणार आहेत (Goa Election) . (Goa Election: Sanjay Raut In goa, Shivsena Will fight 22 seats in Goa assembly)
यासंदर्भात अधिक माहिती देताना यापूर्वीच गोवा राज्य शिवसेना प्रमुख जीतेश कामत यांनी सांगितले होते की, खासदार राऊत यांच्या भेटीवेळी मांद्रे, पेडणे येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन तसेच कुठ्ठाळ्ळी व पणजीत काहीजण शिवसेनत प्रवेश करणार आहेत. संजय राऊत दुपारनंतर गोव्यात येणारअसतील.
दरम्यान यापूर्वीच बोलताना गोव्यात आम्ही निवडणूक नक्की लढतो आहोत. उत्तर प्रदेश मध्ये देखील 80 ते 90 जागा लढविण्याचा देखील आमचा विचार सुरू आहे. तसेच आम्ही युती करु शकतो याबाबत पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.त्याच पार्शवभूमीवर त्यांचा आजचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
आता शिवसेना गोव्यात 22 जागा लढवणार असल्याचे सांगत संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.