MGP Leader Pravin Arlekar (Goa Politics)
MGP Leader Pravin Arlekar (Goa Politics) Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: कॅसिनोविषयी उपमुख्यमंत्री आजगावकर खोटे बोलतात; मगोप नेते प्रवीण आर्लेकर

निवृत्ती शिरोडकर

Goa Politics: धारगळ पंचायत क्षेत्रातील चार लाख चौरस मीटर जागेत कॅसिनोला (Casino Goa) गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मंजुरी दिली आहे. आणि त्या मंडळावर उपाध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy CM Babu Ajgaonkar) हे आहेत तरीही आपल्याला त्या विषयी काहीच माहित नाही आणि मंजुरीही मिळाली नसल्याचे, विधान करून पेडणेवासीयांची दिशाभूल करत आहे. आता सरकार खोटे बोलते कि उपमुख्यमंत्री आजगावकर खोटे बोलतात. त्यांनी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पेडणेचे मगोचे नेते प्रवीण आर्लेकर (MGP Leader Pravin Arlekar) यांनी केली आहे.

किमान तीन लाख ८२ हजार चौरस मीटर जागेत डेल्टा कॉर्पचा गेमिंग झोन उभारला जाणार आहे. या प्रकल्पाला २०२० साली तत्वता मान्यता दिली होती . आता पूर्णपणे मंजुरी दिल्याने पेडणे तालुक्यात खळबळ माजली आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना ३ रोजी पत्रकारांनी विचारले असता, या प्रकल्पाला अजून सरकारने मंजुरी दिली नाही, आपण वर्तमान पत्रात वाचल्याचे सांगून ,अश्या घाणेरड्या प्रकल्पाना थारा नको, लोकांचा विरोध असेल तर आपलाही त्याला विरोध असणार असल्याचे सांगितले होते.

विशेष म्हणजे प्रोत्साहन गुतंवणूक मंडळावर उपाध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आहेत, आणि मंजुरी देताना जर त्याना विश्वासात घेतले नाही तर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी मंडळाचा आणि आपल्या पदाचाही राजीनामा द्यावा अशी मागणी प्रवीण आर्लेकर यांनी केली आहे. प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना पेडणे मतदार संघातील ज्या लोकाना मुलभूत गरजा आहे त्या पुरवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. लोकप्रतिनिधी सध्या केवळ नारळ फोडण्याचे काम करतात असा दावा करून केसिनो किंवा गेमिंग झोन ची कोणत्या पेडणेवासियांनी मागणी केली होती , कि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनीच स्वता मागणी केली होती का असा प्रश्न प्रवीण आर्लेकर यांनी उपस्थित केला आहे.

गेमिंग झोन ला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यात कारकिर्दीत मंजुरी दिली जाते जर त्याना विश्वासात घेवून मंजुरी दिली नसेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी स्वाभिमानी पेडणेवासीयांची दिशाभूल करू नये असे आवाहन आर्लेकर यांनी केले. येथील युवकाना रोजगाराची गरज असताना गेमिंग झोन आणून युवकाना व्यसनाधित करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये असे सांगून आगामी काळात केसिनोच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Bloomberg Billionaires Index: मुकेश अंबानी जगातील 11वे सर्वात श्रीमंत व्यक्ती; ब्लूमबर्गने 'सुपर रिच' लोकांची यादी केली जाहीर

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

SCROLL FOR NEXT