Goa: आमचा व्यवसाय बंद, मग बाहेरच्यांना प्रवेश कसा...

पत्रादेवी चेकनाक्यावर महाराष्ट्रातील रेती वाहतुकांना तपासणीविना प्रवेश (Goa)
Local sand traders talking to reporters (Goa)
Local sand traders talking to reporters (Goa)Dainik Gomantak

Goa: पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल या नदीतीत (Chapora & Tiracol River) सध्या बेकायदा उपसा (Illegal sand extraction) करणाऱ्या रेती व्यावसायिकांवर नियंत्रण आले आहे. अधून मधून खाण भूगर्भ खात्याचे (Department of Mines Geology) भरारी पथक तालुक्याच्या मामलेदाराना सोबत घेवून कारवाई करत असतानाच महाराष्ट्र राज्यातील ट्रक रेती घेवून पत्रादेवी नाक्यावरून (Patradevi Check post) बिनधास्तपणे प्रवेश करत आहे. त्या वाहनांची कुठेच तपासणी होत नसल्याने पेडणे ट्रक मालक संघटना संतप्त बनली आहे. स्थानिकांचा रेती व्यवसाय बंद करून बाहेरील रेती व्यवसाय सरकार कशा चालू ठेवत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

Local sand traders talking to reporters (Goa)
Goa Plan: ...पण गोवा पर्यटकांसाठी तयार आहे का?

पेडणे ट्रक मालक संघटनेने (Pernem Truck Owner Union) स्थानिक पत्रकारांकडे आपल्या कैफियती मांडताना आमच्या रेती व्यवसाय बंद आहे. सरकारने आम्हाला नियम शिथिल करून रेती उपसा करण्यास परवाने द्यावेत, आम्ही कायदेशीर व्यवसाय करण्यास तयार असल्याचे सांगितले. आमचा व्यवसाय करून महाराष्ट्र भागातील मोठ्या प्रमाणात रेती राज्यात येत आहे. पत्रादेवी या चेक नाक्यावर या रेती व्यावसायीकांच्या वाहनांची कागदपत्रे तपासली जात नाही. कागद पत्रे तपासण्यापूर्वीच या वाहनांना कसा प्रवेश दिला जातो असा संतप्त सवाल व्यावासायीकानी उपस्थित केला.

माजी सरपंच आणि व्यवसाईक रोकी फर्नाडीस यांनी माहिती देताना आमचा व्यवसाय बंद आहे. रेती उपसा करण्यासाठी राज्य सरकारने आम्हाला परवाने द्यावेत, मात्र नियमात थोडी शिथलता आणली पाहिजे आम्ही कायदेशीर व्यवसाय करायला तयार आहोत, चतुर्थीच्या काळात स्थानिक व्यावासायीकाना चार पैसे कमावण्यासाठी सरकारने संधी द्यावी अशी मागणी केली आहे.

Local sand traders talking to reporters (Goa)
Goa: वजन आणि माप खात्याची डिचोलीत धाड

पेडणे ट्रक मालक संघटनेचे मिलिंद शेट्ये यांनी बोलताना बाहेरून दिवसाला शेकडो वाहानातून रेती येते पत्रादेवी येथे चेकनाका आहे मात्र त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची तपासणी केली जात नाही. पर राज्यातून येणाऱ्या वाहनाकडे पास नाही, कागद पत्रे नसतात त्याना प्रवेश कसा दिला जातो. बेकायदा परराज्यातून येणारी रेती वाहतून रोखावी आणि आम्हाला स्थानिकाना रेती काढण्यास लवकर परवाने द्यावेत अशी मागणी मिलिंद शेट्ये यांनी केली आहे.ट्रक मालक संघटनेने न्हयबाग पोरस्कडे येथे काही ट्रक अडवून वाहतूक अधिकाऱ्यांना तपासणीसाठी दिले. अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com