Goa Politics: Former Deputy Chief Minister Sudin Dhawlikar
Goa Politics: Former Deputy Chief Minister Sudin Dhawlikar  Dainik Gomantak
गोवा

सरकार नव्हे, राजकारण तुमच्या दारी; ढवळीकर

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘सरकार तुमच्या दारी’ (Sarkar Tumchya Dari) हा सरकारचा कार्यक्रम असल्याने त्यामध्ये सरकारने त्यांच्या योजनांसदर्भात माहिती देण्याऐवजी अशा कार्यक्रमातून भाषणांमध्ये (Speeach) विरोधकांवर टीका केली जात आहे. त्यामुळे हा कार्यक्रम ‘राजकारण तुमच्या दारी’ असा बनला आहे. पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य तसेच घरे बांधून देण्यास सरकारला शक्य नाही. मात्र, या कार्यक्रमावर सरकार अफाट खर्च करत आहे, अशी टीका आमदार सुदिन ढवळीकर (d) यांनी केली.

दोन दिवशीय विधानसभा अधिवेशन १८ व १९ ऑक्टोबरला होत आहे. या दोन दिवसांत लोकांचे प्रश्‍न मांडण्यास किती वेळ मिळणार हे लोकांना सरकारच्या अशाप्रकारच्या कमी दिवसांच्या अधिवेशनावरून कळून चुकले आहे. या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे व त्यानंतर राज्यात नवे सरकार विधानसभेत असेल. मी सादर केलेल्या प्रश्‍नांपैकी एकच प्रश्‍न चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. गेल्या पूर स्थितीतील काळात लोकांची किती घरे बांधून दिली व किती अर्थसाहाय्य दिले गेले यासंदर्भात तसेच संजीवनी साखर कारखान्याला संजीवनी देण्यासाठी सरकारची योजना अशा दोन लक्ष्यवेधी सूचना मांडल्या आहेत, असे ढवळीकर म्हणाले.

साखळी येथील कार्यक्रमात तेथील महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची गरज नव्हती. सरकारने पूरग्रस्तांना घरे बांधून देण्याऐवजी या कार्यक्रमांवर अफाट खर्च करत आहे. सरकारने काढलेली अधिसूचना ४८ तासांत मागे घेतात यावर लोकांनी या सरकारबाबत विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत लोकांनी खरे-खोटे, वाईट-बरे याचा सारासार विचार करायला हवा. तसेच भूमिपुत्रांनी काय योग्य याचा आताच विचार करण्याची वेळ आहे, असे ते म्हणाले.

मगोबाबत अफवा

गेली २२ वर्षे मी राजकारणात व मगो पक्षाशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे दीड वर्षासाठी मी एखाद्या पक्षाशी युती करून राज्यसभेत जाणार का? असा प्रश्‍न सुदिन ढवळीकर यांनी उपस्थित केला. उगाचच काही अफवा उडविल्या जात आहे. मगोच्या नेत्यांना नाराज व बुचकळ्यात टाकण्यासाठी कोणीतरी अशा वावड्या उठवित आहे, असे मत सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT