Goa Politics Confusion about alliance in Fatorda  Dainik Gomantak
गोवा

युती होणार की नाही, फातोर्डात संभ्रम..!

कार्यकर्त्यांच्यात नाराजीचा सुर..

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात युती होऊन हा मतदारसंघ गोवा फॉरवर्डला (Goa Forward) सोडणार की एकला चलो धोरण स्वीकारून काँग्रेस या मतदारसंघात आपला उमेदवार उभा करणार हा प्रश्न सध्या फातोर्ड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला (Goa Politics) असून त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रमही निर्माण झाला आहे.

काँग्रेस पक्षाने मागच्या निवडणुकीत युतीचा प्रश्न असाच झुलवत ठेवत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवार उभा केला होता. मात्र काँग्रेसचा उमेदवार आपली अनामत रक्कमही राखून ठेऊ शकला नव्हता.

आम्हाला मिळत असलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याकडे युतीविषयी बोलणी केली आहेत. पण याची कल्पना आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र अजून कुणी दिलेली नाही. पक्ष कोणता निर्णय घेणार याची कल्पना फातोर्ड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.

काँग्रेसने जर ही निवडणूक लढवली तर उमेदवार कोण असेल याबद्दलही कार्यकर्त्यांमध्ये शासंकता आहे. काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर हे स्वतः या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत तर दुसऱ्या बाजूने दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी ही उमेदवारी मडगावच्या माजी नगराध्यक्ष एथल लोबो यांना मिळावी यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत.

सार्दीन यांनी सुरवातीपासून या युतीला विरोध करताना फातोर्डा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार उभा करावा अशी भूमिका घेतली आहे. सध्या ते दर आठवड्याला मडगावात असलेल्या काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात येऊन निवडणुकीच्या दृष्टीकोनातूकॅन मार्गदर्शन करत असतात.

यापूर्वी गट अध्यक्ष चिदंबर चणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फातोर्डा गट बैठकीत काँग्रेसने गोवा फॉरवर्डशी युती न करता स्वतः ही जागा लढवावी अशी मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT