सावईवेर : मला दोनवेळा मुख्यमंत्रिपदाची ऑफर आली. पण, मगो पक्षाच्या प्रेमापोटी मी ती झुगारून लावली(Goa Politics) . मगो पक्ष हा गोमंतकीयांचा स्थानिक पक्ष आहे, जनतेचा पक्ष आहे, तो कोणत्याही पक्षात विलीन करण्याचा अधिकार आम्हाला नाही. नि:स्वार्थी कार्यकर्त्यांचा मगो पक्ष आहे, असे प्रतिपादन आमदार सुदिन ढवळीकर (Former Deputy Chief Minister Sudin Dhawlikar) यांनी सावईवेरे येथे मगोच्या जागृती सभेत केले.
सावईवेरे येथील श्री सातेरी व खामिणी देवस्थानात दीपक ढवळीकर यांच्या प्रचाराचे श्रीफळ वाढविल्यानंतर व आशीर्वाद घेतल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, प्रिया च्यारी, शिवदास गावडे, मोहन वेरेकर, प्रियोळ गटाध्यक्ष हरिश्चंद्र जल्मी व सच्चित पालकर, फ्रान्सिस लोबो, मधू गावकर, भारत जल्मी, दामू दिवकर, स्वाती पालकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पुष्पा गावडे, स्वाती पालकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन पुष्पा गावडे यांनी केले.
डॉ. मंजुनाथांना श्रद्धांजली
मगोच्या सभेत सर्व कार्यकर्ते व मान्यवरांतर्फे गोमेकॉतील हृदयरोगतज्ज्ञ मंजुनाथ देसाई यांच्या निधनाबद्दल एक मिनिट उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. ते परोपकारी डॉक्टर होते, असे मत सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त करून आदरांजली वाहिली.
संघटन मजबुती
मगोचे तत्वनिष्ठ विचार आणि स्वच्छ राजकारण, समाजकारण केले आहे. गोमंतकीयांचे हित लक्षात घेऊन वाटचाल करणाऱ्या मगो संघटितपणे मजबूत करणे गरजे आहे. मगोचे विधानसभेत संख्याबळ वाढले पाहिजे, असे मोहन वेरेकर म्हणाले.
संजीवनीवर डोळा
आज संजीवनी साखर कारखान्याची जमीन सरकार विकण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी 80 कोटींचा व्यवहार झाल्याचा अंदाज आहे. कंपनीला विश्वासात न घेता व त्यांच्या बैठकीतील कोणताही ठरावसुद्धा न घेता जमीन बेकायदेशीररित्या विकण्याचा आटापिटा चालू आहे. भाजप युती करायला तयार नव्हता, पण आज त्यांचे उमेदवार निवडून येण्याची शाश्वती नसल्याने युतीची कल्पना सूचत आहे, असेही ढवळीकर म्हणाले.
प्रियोळमधून दीपक
सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, प्रियोळ मतदारसंघात मगो पक्षाचा उमेदवार म्हणून दीपक ढवळीकर हे निवडणूक लढणार आहेत. मगो पक्ष हा या मातीतला पक्ष असल्याने आज गोमंतकाला मगो पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.