खाणग्रस्त मयेतील शेतकऱ्यांचे डिचोलीत शक्तीप्रदर्शन

मयेतील संतप्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी करीत काढला मोर्चा
Mayem farmers staged protest demanding compensation
Mayem farmers staged protest demanding compensationDainik Gomantak

डिचोली: खाण कंपन्यांकडून गेल्या सहा वर्षांपासूनची थकीत नुकसान भरपाई मिळावी म्हणून मयेतील शेतकरी पुन्हा एकदा एकवटले आहेत. थकीत नुकसान भरपाई त्वरित द्या. अशी मागणी करीत संतप्त शेतकऱ्यांनी आज (सोमवारी) डिचोलीत शक्तीप्रदर्शन करीत शहरात मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

अखिल भारतीय किसान सभेच्या बॅनरखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. पाजवाडा येथील श्री दत्त मंदिराकडून या आंदोलनाला सुरवात झाली. आम्हाला नुकसान भरपाई त्वरित द्या, आमची शेती आणि नैसर्गिक जलस्रोते वाचवा अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी शहरात शक्तीप्रदर्शन केले.

Mayem farmers staged protest demanding compensation
स्‍वार्थी राजकारणामुळे पेडणे मतदारसंघातील शेतकऱ्यांचा बळी

सोनारपेठमार्गे बगलरस्त्यावरून कदंब बसस्थानकाकडून मोर्चा मामलेदार कार्यालयासमोर जुन्या बसस्थानकावर मोर्चाची सांगता झाली. किसान मोर्चाचे नेते ऍड. जतीन नाईक, कामगार नेते व्हिक्टर ब्रागांझा आणि एस. एस. नाईक मये विभागाचे अध्यक्ष कृष्णा गडेकर, स्वयंम कामत, पंच प्रेमेंद्र शेट, माजी सरपंच सुभाष किनळकर आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढलेल्या या मोर्चात चारशेहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती.

Mayem farmers staged protest demanding compensation
गोव्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू असतांना मुख्यमंत्री राज्‍याबाहेर

खाण व्यवसायामुळे शेती धोक्यात आल्याने खाणग्रस्त मयेतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे मये भागात कार्यरत असलेल्या सध्याच्या सेझा आणि चौगुले कंपनीशी लढा चालू आहे. 2013 नंतर आतापर्यंतची नुकसान भरपाई देण्यास कंपनीकडून टाळाटाळ झाली आहे. थकीत नुकसान भरपाई मिळावी यासाठी किसान सभेमार्फत शेतकऱ्यांनी डिचोलीच्या मामलेदारांकडे अर्ज केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com