गोवा राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा वास्को येथे पत्रकार परिषदेत बोलताना (Goa Politics)  प्रदीप नाईक / दैनिक गोमन्तक
गोवा

Goa Politics: दाबोळीत भाजपची पायाखालची जमीन सरकू लागल्याने तानावड्यांचे माझ्यावर बिनबुडाचे आरोप

नौदलाने माफी मागून स्वातंत्र्य दिन साजरा केला असताना, भाजप प्रदेशाध्यक्ष शेटतानावाड्यांचा जुझे फिलिप डिसोझावर देशद्रोहाचा आरोप (Goa Politics)

Dainik Gomantak

Goa Politics: नौदलाने (Indian Navy) सेंट जासिंन्तो बेटावरील (St. Jacinto Island) रहिवाशांची माफी मागून संयुक्तपणे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला असताना सुद्धा राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष (Goa BJP President) सदानंद शेटतानावडे माझ्यावर देशद्रोहाचा आरोप (Accused of treason) करीत आहे. खरतर दाबोळीत भाजपची पायाखालची जमीन सरकू लागल्याने ते बिनबुडाचे आरोप माझ्यावर करीत आहे. 2000 साली पर्रीकर यांना मुख्यमंत्री करण्यामागे माझा महत्त्वाचा वाटा होता. एवढे करून सुद्धा मला देशद्रोहीची उपमा देऊन भाजप पक्ष एकदम खालच्या दर्जाचे राजकारण करीत असल्याची टीका गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा (Goa NCP President Juze Philip D'Souza) यांनी केली. वास्को येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून वरील माहिती जुझे फिलिप डिसोझा यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे सरचिटणीस प्रीतम नाईक, सदस्य अमित मुल्ला, साईनाथ आमोणकर उपस्थित होते.

नौदलाच्या चुकीच्या मार्गाने स्वतंत्र दिन साजरा करण्याला होता विरोधात

माहिती देताना डिसोजा म्हणाले की सर्वप्रथम नौदलाने दाबोळी येथील सेंट जासिंन्तो बेटावर स्वतंत्र दिन साजरा करायचा होता तर स्थानिक पंचायत, पोलीस, रहिवाशांना सांगणे महत्त्वाचे होते. स्थानिक जनतेला विश्वासात घेतले नाही म्हणून विरोध होणारच. आम्ही स्वतंत्र दिन साजरा करण्यास विरोध केला नव्हता. तर नौदलाने चुकीच्या मार्गाने स्वतंत्र दिन साजरा करण्याच्या विरोधात होतो. नंतर नौदलाला आपली चूक लक्षात येताच त्यांनी स्थानिक रहिवाशांची माफी मागून, येथील चर्च धर्मगुरू बरोबर उपस्थित राहून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला.

माझ्या दाबोळीत निवडणूक लढवण्याच्या भीतीने शेट-तानावडेंचे सैरभैर होऊन विधान

नौदलाने माफी मागितली असताना देखील राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे माझ्यावर देशद्रोहाचा आरोप करून स्वतःबरोबर आपल्या पक्षाची किंमत जगाला दाखवत आहे. मी दाबोळीत निवडणूक लढवणार या भीतीनेच राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सैरभैर होऊन नको ते विधान माझ्याविरोधात करीत असल्याचा आरोप डिसोझा यांनी केला. २००० साली मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री करण्यामागे माझा महत्त्वाचा वाटा होता. तेव्हा मी भाजप पक्षाला पाठिंबा दिल्याने आज भाजपला हे दिवस पाहायला मिळत असल्याची माहिती डिसोझा यांनी दिली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी दाबोलीतून निवडणूक लढविणार असल्याची माहिती डिसोझा यांनी दिली. माझ्या दाबोळीत विविध भागात कोपरा बैठका होत असून येथे महागटबंधनाचा उमेदवार मी असणार अशी माहिती जुझे फिलिप डिसोझा यांनी पत्रकाराना दिली.

मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री सुद्धा जुझे फिलिप डिसोझा यांनी केले होते

शेट तानावडे यांना माहित नसेल जुझे फिलीप डिसोझा प्रथम मुरगाव नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नंतर दोन वेळा आमदार मंत्री सुद्धा झाले होते. राज्य सरकारमध्ये त्याने दोन वेळेला महसूलमंत्री पद भूषविले होते. कदाचित तानावडे यांना विसर पडला असावा. मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री सुद्धा जुझे फिलिप डिसोझा यांनी केले होते. मनोहर पर्रीकर यांनी सदानंद शेटतानावडे यांना पक्षात पपेट (कटपुतली) करून ठेवला होता. आज पर्रीकर हयात नसल्याने त्यांना पंख फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष येणारी विधानसभा निवडणूक दाबोळीतून लढविणार आहे. राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी राज्यातून एखाद्या मतदार संघातून हिम्मत असेल तर निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान राष्ट्रवादी राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रीतम नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT