Goa Politics 

 

Dainik Gomantak 

गोवा

आम आदमी पार्टी भाजपची बी टीम!

गोवा सुराज पक्षाच्या मनोज परबांचा गंभीर आरोप..

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याची विधानसभा निवडणूक (Goa Politics) जसजशी जवळ येत आहे, तसतशी आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. यातच गोवा सुराज पक्षाने पत्रकार परिषद घेऊन सर्वच राजकीय विरोधकांचा समाचार घेतला आहे.

गोव्यात (Goa) बाहेरच्या पक्षांनी येऊ नये. बाहेरील पक्ष गोव्यात येऊन गोमंतकीयांची बदनामी करतात आणि त्याला सत्ताधारी भाजप नेते काहीही बोलत नाही याचाच अर्थ आम आदमी पार्टी भाजपची बी टीम आहे, असा गंभीर आरोप मनोज परब यांनी केला आहे.

गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) रिंगणात डेरेदाखल झालेल्या आम आदमी पार्टी (AAP) आणि तृणमूल काँग्रेसवर (TMC) गोवा सुराज पक्षाच्या मनोज परब यांनी सडकून टीका केली आहे.

कोणताही पक्ष किंवा संघटना ही पैशाशिवाय चालत नाही, मग आम आदमी पक्ष देणग्या न घेता कोणत्या पैशावर पक्ष चालवते असा खडा सवाल त्यांनी केजरीवाल यांना विचारला आहे.

गोव्याच्या विकासासाठी कुठल्याही पक्षाने आपला अजेंडा मांडलेला नाही, जो गोवा सुराज पक्षाने मांडला आहे. आम्ही फक्त बोलून नाही, तर करुनही दाखवणार आहोत, असा दावाही यावेळी मनोज परब यांनी केला. आम आदमी पार्टी गोव्यात भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करण्याची घोषणा करते, मात्र एलिना सालढाणा, दयानंद नार्वेकर यांच्यासारख्या भ्रष्ट नेत्यांना प्रवेश देणारे आम आदमी पार्टी भ्रष्टाचारविरोधी कशी? असा सवालही मनोज परब यांनी विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT