गोवा भाजपच्या 10 वर्षांच्या 'रिपोर्ट कार्ड'वर दिगंबर कामत यांची सडकून टीका

भाजपने गोव्याला दिवाळखोर केल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
Digambar Kamat Politics

Digambar Kamat

Politics

Dainik Gomantak

Published on
Updated on

मडगाव - गोवा लोकायुक्तांनी दिलेली 21 भ्रष्टाचार प्रकरणांची प्रशस्तीपत्रे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सुमारे 200 कोविड रुग्णांचे घेतलेले बळी व मध्यानरात्री लोकशाहीचा केलेले खुन यामुळे भाजप सरकारची दहा वर्षे ही भ्रष्टाचाराची, असंवेदनशीलतेची व विश्वासघाताची म्हणुन इतिहासात नोंद होणार असुन, डबल इंजिन सरकारच्या बाता मारणाऱ्या भाजपने गोव्याला दिवाळखोर केल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

Digambar Kamat

Politics

खबरदारीसाठी पोलीस निरीक्षकांचा वास्कोवासियांना सल्ला

भाजपच्या (BJP) 10 वर्षांच्या 'रिपोर्ट कार्ड'वर विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी सडकून टीका केली व भाजप सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचला. "संकल्प यात्रे" चा आरंभ करणाऱ्या असंवेदनशील व बेजबाबदार भाजप सरकारला आता कायमचे घरी बसविण्याचा "संकल्प" गोमंतकीयांनी केला आहे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

लाखो रुपयांना सरकारी नोकऱ्या विकणाऱ्या भाजप सरकारला काँग्रेस (Congress) पक्षाच्या दबावामुळे या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी लागली. नोकऱ्या विकता याव्यात यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनलाच बाजूला सारले. गोव्यातील बेरोजगारीने गेल्या 60 वर्षातला परमोच्च बिंदू गाठला. मुख्यमंत्री सावंत नोकऱ्यांच्या आश्वासनाची खैरात करत राहिले, प्रत्यक्षात एकाही पात्र तरुणाला नोकरी मिळाली नाही हे सत्य आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी भाजप सरकारच्या समाज कल्याण मंत्र्याला "सेक्स स्कँडल" प्रकरणी राजीनामा द्यावा लागण्याची मोठी नामुष्की या भाजप सरकारवर ओढवली. आपल्या मोबाईलवरुन अश्लील चित्रफीत पाठविणाऱ्या उप-मुख्यमंत्र्यांवर अजुनही कारवाई झालेली नाही. सिद्धी नाईक मृत्युच्या तपासात पुढे काय झाले हे सांगायला सरकार तयार नाही.

दिवसाढवळ्या घडलेले खुनांचे प्रकार, मुलींचे अपहरण व बलात्काराची वाढती प्रकरणे, सर्वत्र पसरलेला ड्रग्स व्यवसाय यावरुन महिलांची सुरक्षा व राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले हे स्पष्ट आहे.

खाण व्यवसाय बंद करणाऱ्या भाजप सरकारने गोव्यात (Goa) "मिशन 30 टक्के कमिशन"चे धोरण राबवुन पर्यटन व्यवसाय संपवला. राजकीय स्वार्थासाठी जीवनदायिनी म्हादईचा सौदा केला. पर्यावरणाचा नाश करुन गोवा मोदी-शहांच्या क्रोनी क्लबला देण्याचा डाव भाजपने रचला. रेल्वे दुपदरीकरण करुन गोव्याचे "कोळसा हब"मध्ये रुपांतर करण्याचे भाजपचे धोरण आहे.

कोविड-19 (COVID-19) महामारीत "टाळी बजाव, थाळी बजाव, दिया जलाव" म्हणत उत्सव साजरे करणाऱ्या भाजप सरकारने "आजाराचा बाजार" करीत सुमारे दोनशे कोविड रुग्णांचे ऑक्सिजन अभावी खुन केले. सरकारच्या गलथान कारभाराने प्राण गमविलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आता योग्य अर्थसहाय्य देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे असा गंभिर आरोप दिगंबर कामत यांनी केला.

Digambar Kamat

Politics

गोवा सुराज पक्षाने गोमंतकीयांना दिले हे 'आश्वासन'

डिजीटल इंडियाचा धिंडोरा वाजविणारे भाजप सरकार गोव्यात अखंडीत इंटरनेट सेवा देण्यास सपशेल अपयशी ठरले. कोविड काळात ऑनलाईन शिक्षणाचा त्यामुळे बोजवारा उडाला व विद्यार्थ्यांचे हाल झाले.

केवळ "जुमलाबाजी"चे राजकारण (Politics) करुन लोकांना मुर्ख बनविण्याचे काम भाजप करीत आहे. गोव्यातील जनता भाजपच्या या जुमल्यांना कंटाळली आहे. या अपयशी आणि निर्लज्ज भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. काँग्रेस पक्षच गोव्यात पुढील सरकार स्थापन करेल, असा ठाम विश्वासही दिगंबर कामत यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com