Meeting Indian Red Cross

Meeting 

Indian Red Cross

Dainik Gomantak 

इंडियन रेड क्रॉस सोसायटीची गोवा राजभवनात वार्षिक बैठक

राज्यपाल पिल्लई यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याबद्द्ल इंडियन रेडक्रॉस सोसायटी मुरगाव शाखेने आभार व्यक्त केले.
Published on

वास्को: इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे राजभवन गोवा येथे आयोजित वार्षिक बैठकीत इंडियन रेडक्रॉस सोसायटी मुरगाव शाखेने फिओला रेगो यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या टीमने उपस्थिती लावली. याबैठकीस गोव्याचे राज्यपाल आणि आयआरएससी, गोव्याचे अध्यक्ष श्री पी. एस. पिल्लई, आयआरसीएस गोवाचे अध्यक्ष गौरीश एम.धोंड, चंद्रकांत गावस, मुरगाव इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या चेअरमन फिओला रेगो, व्हाईस चेअरमन डॉ. कीर्ती नाईक, अर्नाल्डो रेगो आणि डॉ. श्वेता वार्ष्णेय आदी मान्यवर उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Meeting&nbsp;</p><p>Indian Red Cross</p></div>
गोवा भाजपच्या 10 वर्षांच्या 'रिपोर्ट कार्ड'वर दिगंबर कामत यांची सडकून टीका

यावेळी राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai) यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मुरगाव इंडियन रेड क्रॉस (Indian Red Cross) सोसायटीच्या चेअरमन फिओला रेगो यांनी मुरगावात सोसायटीचे कार्यालय नसल्याने समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे नजरेस आणून दिले. राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटी कोणत्याही मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकते आणि गोव्यातील विविध इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असल्यास हस्तक्षेप करण्याची सूचना राज्य अध्यक्ष गौरीश धोंड यांना राज्यपाल पिल्लई यांनी केली.

राज्यपाल (Governor) पिल्लई यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याबद्द्ल इंडियन रेडक्रॉस सोसायटी मुरगाव शाखेने आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com