Goa Political Latest News  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics : भाजप विरोधात मोट बांधण्यास विजय सरदेसाईंकडून सुरवात

पालेकरांशी गुफ्तगू : आज भेटणार राज्यपालांना

दैनिक गोमन्तक

मडगाव : सत्ताधारी भाजपच्या विरोधात राज्यात जबरदस्त आवाज उठविण्यासाठी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची संघटित मोट बांधण्यास सुरवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी आपचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांच्याशी चर्चा केली.

पालिका कायद्यात बदल करण्यासाठी सरकारने जो वटहुकूम काढला आहे, त्यासंदर्भात आपले आक्षेप नोंदविण्यासाठी उद्या विरोधकांचे एक शिष्टमंडळ राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांना भेटणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी सरदेसाई यांनी वटहुकूम आणि सरकारकडून लोकशाहीची हत्या करण्याच्या कृतीबद्दल व्यापक जनमत तयार करण्यासाठी आंदोलन सुरू करू असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आज अमित पालेकर यांच्याशी चर्चा केली.

राज्यात लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. वेगवेगळे लढून आपली शक्ती विभागून घालण्यात काही अर्थ नाही असे सांगून आजची आमची भेट त्यादृष्टीने टाकलेले एक पाऊल होते, असे सरदेसाई यांनी सांगितले.

दरम्यान, सरकारने काढलेल्या वटहुकुमाला न्यायालयात तुम्ही आव्हान देणार का असे सरदेसाई यांना विचारले असता, आमचे कायदा तज्ज्ञ त्यावर विचार करत आहेत, पण त्यापूर्वी उद्या आमचे एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून आमच्या भावना त्यांना सांगणार आहेत, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.

गोव्याच्या भल्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र आवाज उठविण्याची गरज असून यासाठी आमचा सदैव पाठिंबा असेल. - अमित पालेकर, आप, प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT