‘इन्वेस्ट गोवा - 2022’ यशस्वी : मांगिरिष पै रायकर

24 कंपन्यांकडून होणार 5 हजार कोटींची गुंतवणूक
Invest Goa - 2022' success
Invest Goa - 2022' successDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी :  ‘इन्वेस्ट गोवा - 2022’ या गुंतवणूक मेळाव्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंत 24 व्यावसायिकांनी 5 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. यातून 15 हजाराहून अधिक रोजगार संधी निर्माण होतील, अशी माहिती या समेटचे समन्वयक मांगिरिष पै रायकर यांनी दिली.

राज्यात उद्योग वाढीला प्रेरणा मिळावी यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि एफआयसीसीआय यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा घेण्यात आला. राज्यात उद्योग वाढून रोजगार संधी निर्माण व्हाव्यात. राज्याच्या निर्मिती आणि उत्पादन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळातर्फे (आयपीबी) प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून 6 आणि 7 ऑक्टोबर असे दोन दिवस हा मेळावा झाला. त्याला देशभरातील अनेक उद्योजकांनी हजेरी लावून गोव्यातील गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले आहे.

Invest Goa - 2022' success
Govind Gaude : कला अकादमीच्या कामात भ्रष्टाचार दिसत असेल तर सिद्ध करा; गोविंद गावडेंचं थेट आव्हान

रायकर म्हणाले, यापूर्वी 2012 ला असा मेळावा झाला होता. मात्र, त्याचे स्वरूप लहान होते. त्यानंतर 2019 ला ‘व्हायब्रंट गोवा’ हा इव्हेंट झाला. मात्र, त्यानंतर जागतिक महामारीमुळे जगभरातील उद्योगधंद्याला मोठी झळ बसली. या झळीचा फटका राज्यातील उद्योगालाही बसला.

सुदैवाने राज्यात मोठ्या प्रमाणात फार्मा उद्योग असल्याने या काळातही काही उद्योग सुरू राहिले. आता राज्यातील उद्योग वाढीसाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. म्हणूनच हा प्रयत्न होता आणि त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. यात स्थानिक कंपन्यांचा पुढाकारही मोठा आहे. यातून झालेली गुंतवणूक ही राज्याच्या आर्थिक विकासासाठी दीर्घकाळ मदत करणारी आहे.

यापूर्वीच्या 22 औद्योगिक वसाहती आणि आता नव्याने होऊ घातलेल्या डिचोली तालुक्यातील लाटंबार्से आणि केपे तालुक्यातील किटला या औद्योगिक वसाहतींना नव्या गुंतवणूकदारांची गरज होती. यातील काही उद्योग इथे सुरू होतील, असेही ते म्हणाले.

गरज ओळखून गुंतवणूक

गोवा हे नैसर्गिक अधिष्ठान लाभलेले छोटे राज्य आहे. त्यासाठी पर्यावरणाला प्राधान्य देऊन लॉजिस्टिक, कृषी आणि मरिन, शिक्षण, मनोरंजन, माहिती तंत्रज्ञान, स्टार्टअप, संशोधन आणि विकास, पर्यटन आणि औषध उद्योगांना केंद्रबिंदू मानून देशभरातील उद्योगांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 160 हून अधिक उद्योग प्रतिनिधी या मेळाव्याला हजर होते. त्यांच्याकडून 5 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक निश्चित झाली आहे.

उद्योग धोरण जाहीर

या गुंतवणूक मेळाव्यात उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी राज्य सरकारला अपेक्षित असलेले आणि उद्योगाला पूरक असलेले उद्योग धोरण जाहीर करत राज्यात उपलब्ध साधनसुविधांची माहिती दिली. पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटन क्षेत्रासाठी अपेक्षित असलेली आणि आयटी क्षेत्रातील स्टार्टअप, वर्केशन धोरण स्पष्ट केले. माजी केंद्रीय रेल्वे व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्याच्या उद्योगधंद्यासाठी मार्गदर्शन करत गोवा हे लॉजिस्टिक हब बनेल असा आशावाद व्यक्त केला, तर उद्योगांसाठी आवश्यक असलेली ईएसजी पॉलिसी गोव्याने राबवावी असा सल्ला दिला.

या गुंतवणूक मेळाव्याच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे आणि रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. या रोजगार संधी मिळवण्यासाठी स्थानिक बेरोजगार तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. राज्य सरकारने हे प्रयत्न केले असले, तरी युवकांनी या संधी मिळवल्या पाहिजेत आणि त्यातूनच प्रेरणा घेत छोटे उद्योग उभारले पाहिजेत.

- मांगिरिष पै रायकर, समन्वयक, इन्वेस्ट गोवा - 2022

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com