Goa Police will give priority to safety of women and tourists 
गोवा

Goa Police: महिला, पर्यटकांच्‍या सुरक्षिततेला प्राधान्य

राज्यातील वाहतूक समस्येबाबत माहिती मिळाली आहे. त्‍यावर पर्यावरणाचे संरक्षण करून योग्य तो तोडगा काढला जाईल.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांबरोबरच व महिलांची सुरक्षितता, वाहतूक समस्‍येवर उपाय, अंमलीपदार्थ व्यवहारात गुंतलेल्यांविरोधात कडक कारवाई, सायबर क्राईमसाठी अत्याधुनिक उपकरणांची खरेदी यावर आपण जास्‍त भर देणार असल्‍याचे राज्याचे नवे पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी सांगितले. पदाचा ताबा स्‍वीकारल्‍यानंतर ते बोलत होते.

पोलिस मुख्यालयात महासंचालक शुक्ला यांना सलामी देत मानवंदना देण्यात आली. यावेळी खात्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पदाचा ताबा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना शुक्‍ला म्हणाले की, गोवा हे मला काही नवे नाही. सुमारे 17 वर्षे गोव्यात पोलिस सेवेत होतो. त्यामुळे राज्यातील परिस्थिती व समस्यांबाबत पूर्ण कल्पना आहे. राज्यातील वाहतूक समस्येबाबत माहिती मिळाली आहे. त्‍यावर पर्यावरणाचे संरक्षण करून योग्य तो तोडगा काढला जाईल.

पोलिस तपासकामात अत्याधुनिक तंत्रज्ञान महत्वाचे आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान खात्यासाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या यंत्रसामग्रीशिवाय तपासकाम करणे कठीण आहे. सायबर क्राईमसाठी तंत्रज्ञानाची गरज असते. पोलिस खात्याला ते उपलब्ध करण्यात येईल. पोलिसांनी जनतेशी मित्रत्वाच्या भावनेने वागण्याची गरज आहे. पोलिस नागरिकांशी गैरवर्तणूक करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करायला आपण मागेपुढे पाहणार नाही. अनेक वर्षे गोव्यात काम केल्‍यामुळे बहुतांश पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्ग हा ओळखीचा आहे. त्यामुळे काम करताना काही अडचणी येतील असे वाटत नाही, असे शुक्‍ला म्हणाले.

लोकांसाठी दरवाजा उघडाच

पोलिस मुख्यालयातील आपल्‍या कार्यालयाचा दरवाजा लोकांना समस्या मांडण्यास व भेटण्यास खुला असेल. त्यांच्‍या तक्रारींची दखल घेऊन त्या वेळेत निकालात काढण्यात येतील. नागरिकांनी त्यांच्या सूचना केल्यास त्याचे स्वागत असेल. राज्यात अंमलीपदार्थाचा व्यवहार सुरू असला तरी पोलिस खात्याचे अधिकारी त्यावर नजर ठेवून आहेत. त्याचे उच्चाटन करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. गोवा हे ड्रग्जमुक्त राज्य करण्यासाठीही आपले प्राधान्य असेल. अंमलीपदार्थ व्यवहारात वारंवार अटक झालेल्यांविरुद्ध एनडीपीस कायद्याबरोबरच ‘रासुका’खालीही कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कडक पावले उचलली जातील, असा इशारा शुक्‍ला यांनी दिला.

पोलिस ‘पिंक फोर्स’ लवकरच

राज्यातील महिलांच्‍या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार आहे. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी ‘पोलिस पिंक फोर्स’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी तयारी सुरू केली जाईल. महिलांच्या समस्या तसेच विविध प्रकरणे हाताळण्यासाठी महिला पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल. त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. या महिला पोलिस चपळ तर असतीलच तसेच परिस्थितीनुसार संकटांना सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यात असेल, असे शुक्ला यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT