Fake Electricity Bill Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Police: सायबर भामट्यांपासून सावध राहा, बनावट वीज बिल मेसेजना बळी पडू नका, गोवा पोलिसांचं आवाहन

Cyber Fraud Awareness Goa: संपूर्ण राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्सकडून नवनवीन मार्गांचा अवलंब केला जात आहे.

Sameer Amunekar

पणजी: सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्सकडून नवनवीन मार्गांचा अवलंब केला जात आहे. दरम्यान, गोवा पोलिसांनी नागरिकांना बनावट वीज बिल संदर्भातील एसएमएस फसवणुकीपासून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. फसवणूक करणारे स्वतःला वीज विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून ग्राहकांना खोटे मेसेज पाठवत आहेत.

अज्ञात क्रमांकावरून ग्राहकांना मेसेज पाठवत तत्काळ बिलं भरण्याची मागणी केली जाते. आपलं वीजबिल अद्याप भरलेलं नाही. त्वरित बिल भरलं नाही, तर वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा मेसेज पाठवला जातो.

या मेसेजमध्ये अधिकृत वीज विभागाच्या वेबसाइटचा उल्लेख न करता दुसरीच पेमेंट लिंक तसंच नंवर दिला जातो.

गोवा पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गोवा पोलिसांनी नागरिकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, अशा प्रकरणांमध्ये कोणीही फसवले गेले असल्यास त्वरित सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असंही आवाहन केलं आहे.

संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका,अनोळखी किंवा अविश्वसनीय स्रोतांकडून आलेल्या लिंकवर क्लिक करण्याचं टाळा. ओटीपी किंवा बँकिंग तपशील शेअर करू नका. अशा प्रकारचे मेसेज आल्यास अधिकृत वीज वितरण कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून सत्यता तपासा, असं आवाहन पोलिसांनी केलंय.

Goa Politics: 'वीरेश बोरकरांनी चोडणकरांकडून तीन कोटी घेतले', अजय खोलकरांच्या आरोपाने गोव्यात खळबळ; 'आरजी'तील अंतर्गत कलह विकोपाला

Kannada Remark Controversy: मुख्यमंत्र्यांच्या 'कानडी' वक्तव्यावरुन कुठ्ठाळीत रणकंदन; भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप! मारियानो रॉड्रिग्ज आक्रमक

Goa Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात कुचराई! पालिकांना कोर्टाचा दणका; अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईचे आदेश

Rohit Sharma T20 Comeback: '2027 च्या वर्ल्ड कपनंतर टी-20 क्रिकेटमध्ये कमबॅक!' रोहित शर्माच्या विधानाने चर्चेला उधाण, हिटमॅन नेमकं काय म्हणाला? Watch Video

Generations History: सायलेंट जनरेशन, बेबी बूमर्स ते जेन झी आणि अल्फा; बदलत्या पिढ्यांचा रंजक इतिहास अन् तरुण पिढीचा डिजिटल उठाव!

SCROLL FOR NEXT