Goa police suspension, Goa police misconduct, Goa police disciplinary action Dainik Gomanatak
गोवा

Goa Police Suspension : पैशांची मागणी, खुनाचा प्रयत्‍न! राज्यात दहा महिन्‍यांत 16 पोलिसांचे निलंबन! खाकी वर्दीवरील काळे डाग चर्चेत

Goa Police Crime: ऑक्‍टोबर महिन्‍यातच एकूण चार पोलिसांना निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागले असून त्‍यात कळंगूट येथील उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर याचाही समावेश आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: उगवे-पेडणे येथे वाळू तस्‍करांच्‍या वादातून झालेल्‍या गोळीबारात अटक केलेल्‍या संशयितांमध्‍ये दोन पोलिसांचाही समावेश असल्‍याचे उघड झाल्‍यामुळे गोव्‍यातील खाकी वर्दीची काळी बाजू पुन्‍हा एकदा चर्चेत आली आहे.

लोकांकडून लाच स्‍वीकारणे, पोलीस कोठडीत असताना मारहाण करणे, पोलीस सेवा व्‍यवस्‍थित न बजावणे अशा अनेक कारणांमुळे जानेवारी ते ऑक्‍टोबर या दहा महिन्‍यात आतापर्यंत १४ पोलिस निलंबित झालेले आहेत. यात एका पोलिस निरीक्षक आणि एका पोलिस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे.

मडगावात पोलिस कोठडीत असताना एडबर्ग परेरा या युवकाला जबर मारहाण केल्‍यामुळे मडगावचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर यांना निलंबित करून त्‍यांच्‍यावर जबर मारहाणीचा गुन्‍हा नोंद केल्‍यामुळे पोलिस अधिकाऱ्यांची वर्तणूक हा वादाचा विषय बनलेला असतानाच

दोन दिवसांपूर्वी उगवे-पेडणे येथे झालेल्‍या गोळीबारात ज्‍या पाच जणांना अटक केली त्‍यातील ऋषीकेश महाले व गंगाराम महाले हे दोघे आयआरबीचे पोलिस शिपाई असल्‍याचे उघड झाल्‍यामुळे पोलीस खात्‍याची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.

ऑक्‍टोबर महिन्‍यातच एकूण चार पोलिसांना निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागले असून त्‍यात कळंगूट येथील उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर याचाही समावेश आहे.

कळंगूट येथील पोलिसांना दारू पिलेल्‍या पर्यटकांकडून मारहाण होत असतानाच या ठिकाणी पोचलेले उपनिरीक्षक मांद्रेकर यांच्‍याकडे आपली सर्व्हिस रिव्‍हाल्‍वर नव्‍हते, या कारणामुळे त्‍यांना निलंबित करून शिस्‍तभंगाची कारवाई करण्‍यात आली होती.

बेळगावच्‍या एका मास व्‍यवसायाकडून पैशांची मागणी केल्‍याच्‍या आरोपाखाली पोलिसांच्‍या भ्रष्‍टाचार प्रतिबंधक खात्‍याने घातलेल्‍या धाडीत कोकण रेल्‍वेचे पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर आणि पोलिस हवालदार हुसेन महमद या दोघांना अटक करण्‍यात आली होती.

मागाहून त्‍या दोघांना निलंबित करण्‍यात आले. हे प्रक़रण २१ एप्रिल रोजी झाले होते. त्‍याच्‍या काही दिवसांपूर्वीच कोलवा येथील एका स्‍क्रॅपवाल्‍यांकडून लाच घेतल्‍याच्‍या आरोपाखाली तीन पोलिस शिपायांना निलंबित करण्‍यात आले होते तर पोलिस उपनिरीक्षकाच्‍या विरोधात खात्‍याअंतर्गत चौकशी सुरू झाली होती.

या घटनेनंतर पोलीस स्‍थानकाच्‍या निरीक्षकांचीही बदली झाली होती. सप्‍टेंबर महिन्‍यात एका व्‍यावसायिकांकडून दहा हजार रुपयांची लाच मागितल्‍याच्‍या आरोपाखाली वाळपई येथील एका पोलिस शिपायाला निलंबित करण्‍यात आले होते.

साहाय्यक जेलरचा हात!

कोलवाळ तुरुंगात असलेल्‍या गुन्‍हेगारांपर्यंत ड्रग्‍स आणि इतर वस्‍तू पोहोचविण्‍यासाठी सहकार्य केल्‍याच्‍या आरोपाखाली फेब्रुवारी महिन्‍यात झालेल्‍या कारवाईत आयआरबीचे साहाय्‍यक उपनिरीक्षक सूरज तोरस्‍कर याच्‍याबरोबर हवालदार रामेश्‍वर तळकर आणि पोलीस शिपाई प्रसाद शेट्ये यांना निलंबित करण्‍यात आले होते. या घटनेत कोलवाळच्‍या एका सहाय्यक जेलरचा हात असल्‍याचे दिसून आल्‍यानंतर त्‍यालाही निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT