Goa Police Suspended: मद्यधुंद तरुणाला बेड्या घातल्या, पोलीस स्थानकात केली बेदम मारहाण; उपनिरीक्षक सेवेतून निलंबित

Navelim youth assaulted: दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, शिरवईकर याला निलंबित केल्‍याच्‍या वृत्ताला त्‍यांनी दुजोरा दिला.
Margao police sub inspector suspended
Navelim youth assaultedDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नावेली येथील एडबर्ग पेरेरा या युवकाला मडगाव पोलिस ठाण्यात आणून बेदम मारहाण करणे उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर याला बरेच भोवले असून, शिस्‍तभंगाची कारवाई म्‍हणून त्याला सेवेतून निलंबित करण्‍यात आले आहे. वास्‍तविक ही घटना दडपून टाकण्‍याचा प्रयत्‍न झाला होता. मात्र, ‘दैनिक गोमन्तक’ने या अत्याचाराच्‍या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्‍यानंतर या उपनिरीक्षकावर आता कारवाई करण्‍यात आली आहे.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, शिरवईकर याला निलंबित केल्‍याच्‍या वृत्ताला त्‍यांनी दुजोरा दिला. या पोलिस कोठडीतल्‍या मारहाणप्रकरणी केलेल्‍या प्राथमिक पोलिस चौकशीत शिरवईकर हा दोषी आढळून आला. त्याच्यावर वरील कारवाई केली असून, आता त्याच्याविरुद्ध खात्याअंतर्गत चौकशी केली जाईल, अशी माहिती वर्मा यांनी दिली.

Margao police sub inspector suspended
Goa Crime: 'तुम्ही गुन्हा केला आहे', ट्रिपल सीट फिरणाऱ्या अल्पवयीन मुलांना धमकावले; उकळले पैसे; दुर्भाट परिसरात खळबळ

बुधवारी रात्री मारहाणीची ही घटना घडली होती. नावेली येथे पेरेरा हा दारूच्या नशेत दंगामस्ती करीत होता. याबाबत पोलिसांत तक्रार आल्यानंतर घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले होते. ठाण्यातही तो मस्ती करू लागला व पोलिसांना शिविगाळ करू लागला. यावेळी पोलिसांनी त्याला मारहाण केली. यात तो जखमी झाला होता. मागाहून त्याला गोमेकॉत दाखल केले होते.

Margao police sub inspector suspended
Mapusa Police Quarters: 'पोलिसच झाले बेघर'! 50 वर्षांपूर्वीचे म्हापसा पोलिस क्वार्टर्स मोडकळीस, तात्काळ दुरुस्तीची होतेय मागणी

कायद्याचे उल्लंघन!

या युवकाला पोलिस ठाण्यात आणताना त्याला बेड्या ठोकल्या होत्या. कायद्याने तसे करता येत नाही. चौकशीत ही बाब उघड झाली आहे. एडबर्ग याच्यावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू असल्याची माहिती अधीक्षक वर्मा यांनी दिली. तपासणीनंतर त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे निदान गोमेकॉतील डॉक्‍टरांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com