President’s Police Medal 2025 Dainik Gomantak
गोवा

President’s Police Medal: पोलिस सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुदेश एस. नार्वेकर आणि भानीसिंह राठोड यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

Goa Police Awards: गोव्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या पोलिस सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलिस पुरस्कार जाहीर झाला आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या पोलिस सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलिस पुरस्कार जाहीर झाला आहे. गोवा पोलिसांचे डीवायएसपी सुदेश एस. नार्वेकर यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे, त्यांच्यासोबत उपनिरीक्षक भानीसिंह राठोड यांनाही राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

डीवायएसपी सुदेश नार्वेकर वर्ष १९९९ मध्ये पोलीस सेवेत पीएसआय भरती झाले होते आणि त्यानंतर त्यांच्या पदोन्नती होऊन पोलीस निरीक्षक म्हणून २६ वर्ष पोलीस सेवेत काम केले. यापूर्वी देखील नार्वेकरांना पोलीस सेवेत बाजवलेल्या सेवेसाठी मुख्यमंत्री सुवर्णपदक आणि डीजीपीचा सन्मानचिन्ह मिळाले आहे.

दुसऱ्या बाजूला सहाय्यक गोव्याचे उपनिरीक्षक आयकोदन बालकृष्णन यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

मूळचे केरळचे रहिवासी असलेले बालकृष्णन यांनी १९८७ मध्ये दिल्ली पोलिसांतून आपल् कारकिर्दीची सुरुवात केली आणि२००४ मध्ये सीबीआयमध्ये रुजू झाले, त्यानंतर २०१२ मध्ये त्यांची सीबीआय गोवा म्हणून नियुक्ती झाली. वर्ष २०१६ मध्ये गुणवंत सेवेसाठी भारतीय पोलिस पदक देण्यात आले होते.

अधीक्षक कौशल यांचाही सन्मान

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल (आयपीएस) यांना २६ रोजी प्रजासत्ताकदिनी मुख्यमंत्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रशासनातील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल, तसेच सार्वजनिक सेवेतील उत्कृष्ट कार्य आणि नवोपक्रमासाठी हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT