
Goa Police Destroyed Drugs Worth 2.17 Crore
पणजी: विविध कारवाईत राज्यातून जप्त करण्यात आलेल्या तब्बल २.१७ कोटी रुपये किंमतीच्या अमली पदार्थांची गोवा पोलिसांनी विल्हेवाट लावली आहे. यामध्ये गांजा, चरस, कोकेन, एलएसडी यासारख्या अमली पदार्थांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन्ही जिल्ह्यातून ४९.१७ किलो वजनाचे विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले. यामध्ये कोकण पोलिसांनी केलेल्या अमली पदार्थ विरोधी कारवाईचा देखील समावेश आहे. ट्रायल आणि अपील कालावधी संपलेल्या तीस विविध प्रकरणातील अमली पदार्थाची विल्हेवाट पोलिसांनी लावली आहे.
अमली पदार्थ विरोधी शाखेच्या पथकाने जप्त केलेल्या ४९.१७ किलो वजानाच्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावली. यात गांजा, चरस, कोकेन, एमडीएमए आणि एलएसडी यासारख्या अमली पदार्थांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत दोन कोटी १७ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेहमीच पर्यटकांच्या हॉट लिस्टवर असणाऱ्या गोव्यात विविध मार्गाने अमली पदार्थाची तस्करी होत असते. पर्यटन हंगाम आणि वर्षाच्या अखेरीस तस्करीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे स्थानिक पेडलर ते आंतरराष्ट्रीय तस्करांवर पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक या हालचालींवर लक्ष ठेऊन असते. संशयितांना अटक केल्यानंतर संबधिताकडून जप्त करण्यात आलेला पदार्थाची पोलिस खाते विल्हेवाट लावत असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.