
गोवा पोलिसांनी रविवारी दोन परदेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरून अटक केली. हरमल येथील ओम लेक रेस्टॉरंट पार्किंग परिसरात छापा टाकत ही कारवाई केली आहे.
तोशी मासाओ निव्हा (वय - २४ वर्ष, जपान) आणि फ्लोरियन पीटर क्रिस्ट (वय - ३४ वर्ष, जर्मनी) या दोघा विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे ४ अमली पदार्थ चरस पोलिसांनी जप्त केले आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हरमल येथील ओम लेक रेस्टॉरंट पार्किंग परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांची तपासणी सुरू केली असता, नाईटक्लबच्या पार्किंग क्षेत्रात दोन परदेशी नागरिकांना अडवले, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
दोन्ही परदेशी नागरिकांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे अमली पदार्थ आढळून आला. आरोपी जर्मन आणि जपानी नागरिक आहेत. दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
राज्यात अमली पदार्थांच्या व्यापाराविरुद्ध आणि वापराविरुद्धची लढाई सुरू ठेवण्यासाठी एएनसीकडून ही कारवाई करण्यात आलीय. दोन्ही परदेशी पर्यटक आहेत, ते नाईटक्लबमध्ये पार्टीसाठी आले होते.
याचदरम्यान एएनसीने त्यांना संशयावरून ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे अमली पदार्थ आढळून आला, असं अँटी नार्कोटिक सेलचे पोलिस निरीक्षक साजित पिल्लई यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं.
अमली पदार्थांच्या व्यापाराविरुद्ध कडक उपाययोजना करण्यास एएनसीने सांगितलं आहे. विशेषतः क्लबमध्ये येणाऱ्या, पार्टी करणाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिलेत, असंही पिल्लई यांनी स्पष्ट केलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.