Goa Illegal Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Liquor Seized: गोव्यात चेकनाक्‍यांवर 3.14 कोटींची दारू जप्‍त! मागच्या वर्षी मोठी कारवाई; मुख्‍यमंत्र्यांची माहिती

Goa Illegal Liquor Seized: गतवर्षी सर्वाधिक सुमारे १.२५ कोटींची दारू जप्‍त करण्‍यात आल्‍याचे मुख्‍यमंत्री सावंत यांनी विधानसभेतील दिलेल्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून समोर आले आहे.

Sameer Panditrao

पणजी: गेल्‍या साडेतीन वर्षांत गोवा पोलिसांनी सहा चेकनाक्‍यांवर सुमारे ३.१४ कोटींची बेकायदा दारू जप्‍त केली आहे. त्‍यात गतवर्षी सर्वाधिक सुमारे १.२५ कोटींची दारू जप्‍त करण्‍यात आल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍नाला दिलेल्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून समोर आले आहे.

आमदार वीरेश बोरकर यांनी याबाबतचा प्रश्‍न विचारला होता. गेल्‍या २०२२-२३ ते आतापर्यंत पोलिसांनी चेकनाक्‍यांवर किती रुपयांची दारू जप्‍त केली, बेकायदा दारू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी सरकारने कोणत्‍या उपाययोजना केल्‍या आहेत, कर्मचाऱ्यांच्‍या हजेरीवर लक्ष ठेवण्‍यासाठी कोणते उपाय योजले आहेत, असे प्रश्‍न विचारले होते. आमदार बोरकर यांच्‍या प्रश्‍नांवर उत्तरे देताना २०२२-२३ ते आतापर्यंतच्‍या साडेतीन वर्षांत पत्रादेवी, न्‍हईबाग, मोले, पोळे, दोडामार्ग आणि केरी या सहा चेकनाक्‍यांवरील पोलिसांनी सुमारे ३.१४ कोटींची बेकायदा दारू जप्‍त केल्‍याचे म्‍हटले आहे.

राज्‍यातून बेकायदेशीररीत्‍या दारूची वाहतूक होऊ नये, यासाठी सर्व चेकनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे सीसीटीव्‍ही पूर्णपणे कार्यरत असून, ते मुख्य कार्यालयाशी जोडण्‍यात आले आहेत. अबकारी खात्‍याने आता चेकनाक्यांवर पॅन-टिल्ट-झूम (पीटीझेड) निरीक्षण कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, हे कॅमेरे वाहनांच्या हालचालींचे ट्रॅकिंग करण्‍यास सक्षम असतात, असे मुख्‍यमंत्र्यांनी म्‍हटले आहे.

प्रत्येक चेकनाक्‍यावर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंदणी ठेवण्‍यासाठी तसेच कामांचे विभाजन करण्‍यासाठी मस्टर रोल ठेवला जातो. सीमा ओलांडून गोव्‍यात येणाऱ्या आणि गोव्‍यात जाणाऱ्या सर्व जड वाहनांवर पोलिसांकडून कडक नजर ठेवली जात असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले आहे.

‘अबकारी’च्‍या महसुलात सहा कोटींची वाढ

२०२३-२४ च्‍या तुलनेत २०२४-२५ मध्‍ये अबकारी खात्‍याच्‍या महसुलात सहा कोटींची वाढ झाल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार वीरेश बोरकर यांनी याबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नाच्‍या उत्तरातून दिली आहे.

२०२२-२३ मध्‍ये अबकारी खात्‍याला २९३.२६ कोटींचा महसूल मिळाला होता. २०२३-२४ मध्‍ये घटून तो २५४ कोटी झाला होता. परंतु २०२४-२५ मध्‍ये तो २६०.१२ कोटी झाल्‍याचेही मुख्‍यमंत्र्यांनी म्‍हटले आहे.

जप्‍त केलेली दारू

२०२२-२३ : ९८.९१ लाख

२०२३-२४ : ९९.९८ लाख

२०२४-२५ : १.२५ कोटी

२०२५-२६ : ८.१८ लाख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT