
पणजी: गेल्या पाच वर्षांत राज्यात बेकायदेशीररीत्या दारूची निर्मिती, वाहतुकीसंदर्भात १,३९५ प्रकरणे घडली. यातील सर्वाधिक ३६६ प्रकरणे सासष्टीत घडल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. या काळात किती नवे परवाने देण्यात आले तसेच किती निलंबित आणि रद्द करण्यात आले, याची माहिती आलेमाव यांनी तालुकानिहाय मागवली होती.
त्यावर या पाच वर्षांच्या काळात एकूण २,३६५ परवाने देण्यात आले. दहा निलंबित करण्यात आले, तर विविध कारणांमुळे ७६६ परवाने रद्द करावे लागले, असे मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
अवैध दारू निर्मिती आणि विक्री प्रकरणी कोणत्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे, या प्रश्नाला अबकारी निरीक्षक प्रमोद जुवेकर आणि अश्विनी नाईक यांची याबाबत चौकशी सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
तालुका प्रकरणे
तिसवाडी ११७
सत्तरी ५३
केपे १३०
काणकोण ५८
सासष्टी ३१६
मुरगाव १७७
फोंडा ५७
डिचोली ७४
सांगे ११९
बार्देश १५४
पेडणे १४०
...........................................
एकूण १३९५
तालुका दिलेले निलंबित रद्द केले
तिसवाडी २३७ ० ८७
काणकोण ७७ ० १५
फोंडा १५४ ४ ५९
मुरगाव १२३ ० १२७
केपे १०० १ ८२
सांगे ५९ ० ३८
डिचोली ८६ ३ ९
सत्तरी २७ ० ५
बार्देश ६९७ ० ४
पेडणे २४५ १ ६२
सासष्टी ५६० १ २७८
..........................................................................
एकूण २,३६५ १० ७६६
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.