Chrisanta Beira Dainik Gomantak
गोवा

गोवा पोलिसांची धडक कारवाई; चार लाखाच ड्रग्ज जप्त अन् संशयित गजाआड

हणजुणचे पोलिस निरीक्षक सुरज गांवस (Suraj Gaonas) यांनी दै. गोमंतकशी बोलतांना सांगितले.

दैनिक गोमन्तक

इंग्रजवाडा -मार्ना , शिवोली येथील, गोविया विला या रहिवासी प्रकल्पाचा कर्मचारी असलेल्या क्रिसांता बीरा (31) (Chrisanta Beira) या मुळ ओडीसा येथील तरुणास त्याच्या ताब्यातील 4 किलो 48 ग्राम वजनाच्या गांजा या  अमली पदार्थासहित ताब्यात घेतले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत अंदाजे चार लाख रुपये इतकी भरते असे हणजुणचे पोलिस निरीक्षक सुरज गांवस (Suraj Gaonas) यांनी दै. गोमंतकशी बोलतांना सांगितले. 

संशयित क्रिसांता बीरा याच्याविरोधात पोलिसांकडून अमली पदार्थ बेकायदा विक्री प्रकरणी रितसर गुन्हां दाखल करण्यात आला असून सध्या त्याची रवानगी स्थानिक पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, संशयित बीरा यांनी ड्रग्ज विक्रीसाठी वापरात आणलेली होंडा डियो स्कुटर (क्र : जीए-11-एफ /4967 ) हणजुण पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली आहे.

या कारवाईत हणजुण पोलिस स्थांनकाचे उप-निरीक्षक अमीर तरल, यांच्यासमवेत हेड- कॉन्स्टेबल शामसुंदर पार्सेकर, कॉन्स्टेबल गोधेश गोलतेकर, राजेश गोकर्णकर, अनंत भाईडकर, शंभा शेटगांवकर, तसेच  शिवोली आऊट पोस्टचे सचिन उर्फ  सखाराम सांळगांवकर यांनी भाग घेतला. गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फुटबॉल ग्राउंड, मार्ना शिवोलीत  असलेल्या एचकेजीएच या चिकन सेंटर दुकानाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आल्याचे निरीक्षक गांवस यांनी सांगितले. पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT