Goa Police Seize Drugs Worth 85,000 Arrest Two Suspects Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: बेकायदेशीर अमली पदार्थाविरोधात गोवा पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये! 85 हजारांच्या अमली पदार्थासह दोघांना अटक

85,000 Worth Drugs Seized In Goa: मायणा कुडतरी पोलिसांनी दोन जणांना पकडून त्यांच्याकडील 85 हजाराचा अमली पदार्थ जप्त केला. यानोस मताजी (कुडचडे) आणि परसप्पा तलवार (बीजापूर, कर्नाटक)अशी संशयितांची नावे आहेत.

Manish Jadhav

Goa Police Seize Drugs Worth 85,000 Arrest Two Suspects

मडगाव: राज्यात बेकायदेशीर अमली पदार्थाविरोधात गोवा पोलिसांच्या कारवाया वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांत मोठ्याप्रमाणावर बेकायदेशीर अमली पदार्थ गोवा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. यातच आता, मायणा कुडतरी पोलिसांनी एका कारवाईत 85 हजारांच्या अमली पदार्थासह दोन जणांना अटक केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, मायणा कुडतरी पोलिसांनी दोन जणांना पकडून त्यांच्याकडील 85 हजारांचा अमली पदार्थ जप्त केला. यानोस मताजी (कुडचडे) आणि परसप्पा तलवार (बीजापूर, कर्नाटक) अशी संशयितांची नावे आहेत. घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी त्यांना रीतसर अटक केली. बुधवारी (20 मार्च) रात्री चांदर येथील मोला सायलाभाट येथे पोलिसांनी ही कारवाई केली.

संशयित स्वीफ्ट कारमधून आले होते

दरम्यान, संशयित स्वीफ्ट कारमधून आले होते. त्यांच्याकडे 30 हजार रुपये किमतीचे 3 ग्राम हायड्रो गांजा, 30 हजार रुपये किमतीचे 3 ग्राम इस्टसी, 25 हजार रुपये किमतीचे 2.5 ग्राम अँफेटामीना हा अमली पदार्थ जप्त केला. हा अमली पदार्थ संशयितांकडे कुठून आला? तो कोणाला देणार होते? याचा शोध पोलिस (Police) सध्या घेत आहेत. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संकेत नाईक पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT